हे सेतुराज! To Brooklyn Bridge- BY HART CRANE- एक पद्यानुवाद
To Brooklyn Bridge - BY HART CRANE - एक पद्यानुवाद https://soundcloud.com/bharati-birje-diggikar/kygxvllhjs3r पहाटे- पहाटे तरंगात खेळे नवा गारवा शांत विश्रांतसा विसावून पंखांस झेपावतो हा समुद्री ससाणा पुन्हा उंचसा असा वेगवेडी खुळी रिंगणे शुभ्र सांडीत हा दूर झेपावतो जणू मुक्ततेचेच प्रारूप बंदिस्त खाडीजळाच्या नभी बांधतो भरारीतली वर्तुळे पूर्ण रेखीत जातो दिठीलाच ओलांडुनी जशी भास-शी ही शिडे दूर अंधूक दिसतात जातात पाण्यातुनी ..चला शुभ्र पाने भरू आकड्यांनी-करूया व्यवस्थितशा फायली सरे आजचा दीस : आम्हांस ओतेल ही लिफ्ट कार्यालयाच्या तळी सिनेमातल्या भव्य-विस्तीर्ण दृष्टीभ्रमांचे मला घेरती आठव पुढे वाकलेली हजारो मनुष्ये असे दृश्य: जादूभरे लाघव कधी ना कुणाला रहस्ये कळाली , नवे लोक येती तरीही पुन्हा खिळावे पुन्हा मंत्रमायेस डोळे असा खेळ जो रोज संपेच ना इथे बंदराला रुपेरी गतीने तुझ्या पायऱ्या दीर्घ ओलांडती जणू सूर्य येथून आताच गेला झपाटाच तो राह...