Posts

Showing posts from July, 2017

ओझिमांडियस

ओझिमांडियस ( Ozymandias - Percy Bysshe Shelley , 1792 – 1822 ) भेटे एक कुणी मुसाफिर मला प्राचीन प्रांतातला सांगे , ’’काय विचित्र आक्रित दिसे त्या वाळवंटी मला    होते शिल्लक भव्य पाय नुसते उध्वस्त शिल्पातले ओसाडीत उभे प्रचंड भयकारी दृश्य मी पाहिले त्याच्या पैल जरा रुतून बसले वाळूत अर्धे वर   होते मस्तक ध्वस्त त्रासिक दिसे आठी कपाळावर ओठांच्या मुरडीत थंड भरलेला माज सत्तेतला    शिल्पाचे अवशेष जे विखुरले त्यातून ओसंडला     शिल्पी एक कथा सहेतुक तिथे सोडून गेला पुढे त्याचे भाव जिवंत स्पष्ट उरले पाषाणसृष्टीमध्ये   ती बोटे , मन ते खुशाल उडवे खिल्ली कशाचीतरी   शिल्पाच्या तळी वाक्य एक दिसते अंधूक काहीतरी ‘’तो सत्ताधिश ओझिमांडियस मी ! राजाधिराजाच मी ! माझे कार्य बघून तोंड लपवा हे शक्तिशाली तुम्ही ! ’’   उध्वस्तीत प्रचंड खंड पडले. काही न बाकी दिसे. वाळूचेच विशाल ते पसरले साम्राज्य निस्सीमसे . .’’ -भारती बिर्जे डिग्गीकर I met a traveller from an antique land Who said: “Two vast and trunkless legs of stone Stand in the desert . . . Ne