Posts

Showing posts from October, 2022

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- उत्तरार्ध

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- उत्तरार्ध- त्रिगुणाधारित चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे ज्ञानेश्वरांनी दिलेले स्पष्टीकरण " ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप"या अठराव्या अध्यायातील एक्केचाळिसाव्या श्लोकाचे स्पष्टीकरण देताना ज्ञानेश्वर प्रथम चातुर्वर्ण्य कोणते हे सांगून नंतर त्रिगुणांशी त्यांचा संबंध उकलून देतात. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मण हे मुख्य आहेत. तदनंतर क्षत्रिय आणि वैश्य हेही वेदोक्त कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ब्राह्मणांच्याच बरोबरीचे आहेत. चौथ्या शूद्रांचा मात्र वेदांशी संबंध नाही पण त्यांची उपजीविका इतर तीन वर्णांवर अवलंबून असल्याने त्या वृत्तीच्या सान्निध्यात श्रुतीने शूद्रांचा इतर वर्णांबरोबर स्वीकार केला आहे. हे स्पष्ट करताना ज्ञानदेव एक सुंदर उपमा देतात. ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादि तिन्ही वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तर्‍हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥ ८२० ॥ तिये व

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- पूर्वार्ध

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय अठरावा -मोक्षसंन्यास योग- पूर्वार्ध- सतराव्या अध्यायातील श्रद्धात्रय आदि संकल्पनांचा विचार करून अर्जुन पुन्हा त्रस्त झाला.कर्मावर श्रद्धा ठेवूनही दोष टळत नाहीत, तर कर्मेच कशाला हवीत? त्याग व संन्यास त्याहून शतपटीने बरे.मुक्तीचा निश्चित मार्ग त्यांच्याच अनुष्ठानात सामावला आहे ,अशा विचाराने तो प्रश्न विचारण्यास सिद्ध झाला . याप्रमाणे कार्यकारणभावसूत्राने एका अध्यायाच्या शेवटातून दुसऱ्या अध्यायाचा  आरंभ अशी गीतेतील श्रीकृष्णार्जुनसंवादाची मांडणी ओळखून ज्ञानदेवांनी ती मांडणी पंचाहत्तराव्या  ओवीत अधोरेखित केली आहे. ते म्हणतात ," याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका." एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे । आतां ऐका बरवें । पुसिलें जें ॥ ७५ ॥ या ओवीच्या पार्श्वभूमीवर मोक्षसंन्यासयोग या प्रदीर्घ कळसाध्यायाच्या पूर्वार्धाचे आकलन  केले पाहिजे. कळसाध्यायाच्या महत्त्वाचे विवरण करताना मंदिराचेच मनोज्ञ रूपक ज्ञानदेवांनी

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग- श्रद्धेची शास्त्रशुद्ध चिकित्सा करणारा असा हा सतरावा अध्याय आहे .तदनुषंगिक विषयांचीही यात चर्चा आहे. शास्त्राशिवाय कर्माला सुटका नाही हे आधीच्या अध्यायाच्या अंतीचे भगवंतांचे उद्गार अर्जुनाला खटकले. शास्त्रांचा विस्तार अनंत, एकवाक्यतेचा अभाव ,शास्त्रासाठी देशकालपरिस्थितीची अनुकूलता मिळणे अनिश्चित ,अशा वस्तुस्थितीत बिचाऱ्या मुमुक्षूंना गती कोणती अशी शंका अर्जुनाला आली. एका श्रद्धेच्या बळावर ते तरुन जातील का हा क्रमप्राप्त प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला, आणि त्याने भगवंतांना तो विचारला .त्या प्रश्नाची संपूर्ण चिकित्सा भगवंतांनी येथे केली आहे नित्यरीतीप्रमाणे श्रीगुरुस्तवनाने याही अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली आहे. ज्ञानेश्वरवर्णित श्रीगुरुस्तोत्र - या अध्यायातील गुरुस्तोत्रात गुरूला गणरायाच्या रुपात ज्ञानेश्वरांनी पाहिले आहे गेल्या अध्यायात ज्ञानसूर्याच्या स्वरूपात गुरूला कल्पून एका आध्यात्मिक सूर्योदयाचे रूपक ज्ञानेश्वरांनी रचले होते. या अध्यायातील या गणरायरूपकातही तसाच अलौकिक प्रतिभाविलास आहे. ज्ञानदेव म्