Posts

Showing posts from 2021

आस्तिक्यसूक्तमय अस्तिसूत्र – लेखक सुरेंद्र दरेकर

आस्तिक्यसूक्तमय   अस्तिसूत्र  –  लेखक   सुरेंद्र   दरेकर ‘’ बुड़ता   आवरी   मज  ‘’  या   कादंबरीनंतर     अल्पावधीत   सुरेंद्र   दरेकर   यांचं   दुसरं   पुस्तक  ‘’ अस्तिसूत्र  ‘’  संवेदना   प्रकाशनाकडून   आलं   आहे .  यातही   दोन   दीर्घकथा   किंवा   लघुकादंब - यांचा   समावेश   आहे . पहिली   अस्तिसूत्र   आणि   दुसरी   आरण्यक . अस्तिसूत्र   हे   मध्यवर्ती   आणि   अन्य   विपुल   स्त्रीस्वरांनी   गजबजलेलं   कथासूत्र . . हे   कथेचं   पहिलं   वैशिष्ट्य . कथावस्तु   एका   गतकालाकड़े   निर्देश   करणारी  ,  तीमधील   नायिका   गार्गी   आणि   अन्यही   कथौघातील   स्त्रिया   आपापल्या   परीने   व्युत्पन्न आहेत .  स्थलकालावकाशात   घटना   आणि   पात्रांची ,  त्यांच्या   नातेसंबंध   आणि   स्नेहसंबंध   यांची   जी   संपृक्तता   आहे ,  ती   सुरुवातीला काहीशी  बिचकवणारी   पण   संथपणे   वाचकाच्या   मनात   सामावत   जाणारी     आहे . द्वितीय   वाचनात   तर   तिची   गोडी   लागते . कथानकाला   व्यापून   राहिलेला   अर्थव्यवहार   त्यातील   दुर्व्यवहारांसहित   जाणीवपूर्वक   तपशीलवार   पण   लालित्याला   बाधा   येऊ   न   द

अस्तित्वभानाचं अर्घ्य -''बुडता आवरी मज..’’ सुरेन्द्र दरेकर

‘’बुड़ता आवरी मज..’’या संवेदना प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या संग्रहात सुरेन्द्र दरेकर यांच्या दोन दीर्घकथा आहेत. कथा हा फॉर्म असला तरी त्यांची एकूण संपृक्तता दोन कादंब-यांचा ऐवज असलेली अशीच आहे. समकालीन मराठीतील अतिशय समृद्ध असा अस्तित्वानुभव देणा-या अशा या कथा आहेत. दोन्ही कथांचे नायक विज्ञान तत्त्वज्ञान आत्मज्ञान या रूढ श्रेणींच्या पलिकडे जात एका प्रबुद्ध अशा निर्वातात विसावताना जाणवतात. या प्रवासातले त्यांचे सहप्रवासीही अनेक प्रकारचे असले तरी आत्मिक विकासाच्या सहसंवेदना उलगडणारे प्रगल्भ विज्ञान-तत्वज्ञानी गुरु,तितक्याच क्षमतेचे गुरुतुल्य मित्र,सुहृद-स्नेही, प्रिय व्यक्ती यांची गजबज त्यात आहे. या प्रवासातली साधी नोकरमाणसंही साधी नाहीत ( क्रमश: आरती, झेनाबी )कारण नायकांच्या विकसित अंतर्दृष्टीच्या झोतात त्यांच्यातलेही हिरोइक पैलू झळाळून उठतात.  ‘’बुडता आवरी मज ‘’ मधले बाबा (यशवंत )आणि ‘’पॉईज’’मधला महेश यांच्यात काही साधर्म्यस्थळे आहेत. हे नायक किंवा protagonist एकेकाळच्या संपन्न आणि आता पड़झड होत चाललेल्या मोठ्या संयुक्त कुटुम्बाच्या पसा-यात वाढलेले आहेत. बाबांच्या स्वभावात एक अलिप