Posts

Showing posts from June, 2022

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग 'राजविद्या राजगुह्ययोग' असे सुंदर नाव धारण करणारा भगवद्गीतेच्या ऐन मध्यावरील हा नववा अध्याय आहे.यात श्रीभगवंतांनी अध्यात्मविद्येला राजविद्या म्हटले आहे,म्हणजेच अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांची सम्राज्ञी आहे . याहीपुढे जाऊन श्रीभगवंतांनी या अध्यायात अध्यात्मविद्येच्या साधकांसाठी काही विलक्षण गूढांची उकल केली आहे . हेच ते राजगुह्य म्हणजे सगळ्यात मोठे गूढ .श्रीभगवंतांचे हे क्रांतदर्शी विवेचन आणि त्यावरील श्रीज्ञानेश्वरांचे निरूपण यामुळे हा अध्याय गूढाच्या प्रवासातील दीपस्तंभासारखा मार्गदर्शक झाला आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांविषयी व्यक्त केलेली आदरभावना नवव्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांबद्दल आत्यंतिक आदराची भावना प्रकट केली आहे. त्यांनी या श्रोत्यांना 'सर्वज्ञांचा समाज' म्हणून गौरविले आहे. अशा उदारधि श्रोत्यांचा आश्रय असेल, तर लळे व मनोरथ पूर्ण होणारच, कारण हे श्रोते त्यांना श्रीमंत माहेरासारखे कृपाशील व वत्सल वाटतात. कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती । जरी

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय आठवा -अक्षरब्रह्म योग

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय आठवा -अक्षरब्रह्म योग आठव्या अध्यायाच्या सुरुवातीस ब्रह्म ,अध्यात्म, कर्म आदि विषयांवर अर्जुनाचे सात प्रश्न आणि श्री भगवंतांनी त्यांना दिलेली उत्तरे आहेत. भक्तीयोगाचा विषय येथे चर्चिला गेला आहे .प्रयाणकाळ आणि तदनंतरचे शुक्ल आणि कृष्णमार्ग या गूढ विषयांच्या चर्चेने हा अध्याय गहनगंभीर अशा स्वरूपाचा झालेला आहे. अर्जुनाचे सात प्रश्न आठव्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने श्री भगवंताला विचारलेले सात प्रश्न असे आहेत- 1.ब्रह्म म्हणजे काय? 2.कर्म हे कशाचे नाव आहे? 3.अध्यात्म कशाला म्हणतात? ४.अधिभूत कसे असते? ५.अधिदैवत कोण असते? ६.अधियज्ञ तो कोणता? ७.प्रयाणकाळी म्हणजे अंतकाळी, हे मधुसूदना, तुला कसे जाणावे? अशाप्रकारे सातव्या अध्यायाच्या अखेरीस ईश्वराने उल्लेख केलेल्या गहन संकल्पनांचा रोकडा अर्थ अर्जुनाने येथे त्याला विचारलेला आहे. श्रीहरीने या प्रश्नांची दिलेली उत्तरे 1. ब्रह्म - या सच्छिद्र शरीरापासून सर्वत्र ओथंबले असूनही जे गळतही नाही, शून्याहूनही सूक्ष्म व आकाशाच्या पदरातूनही गाळून घ्यावे इतके विरळ, असे तत्त्व ते ब्रह्म. एर्‍हवीं सपूरपण तयाच

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय-अध्याय सातवा -ज्ञानविज्ञानयोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय सातवा -ज्ञानविज्ञानयोग  सातव्या अध्यायामध्ये श्रीभगवंतांनी ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या संकल्पनांची मूलभूत स्वरूपाची चर्चा केली आहे .त्यांच्या स्वतःच्या व्यापक रूपाचा विस्तार वर्णन केला आहे .त्यांच्या दैवी मायेची दुर्लंघ्यता कथन केली आहे. अतिशय रोचक आणि परिपूर्ण अशा उपमा आणि रूपके यांच्या साहाय्याने या सर्व  संकल्पनांचे ज्ञानेश्वरांनी रसपूर्ण स्पष्टीकरण केले आहे . या अध्यायाच्या शेवटी अधिभूत ,अधिदैव,अधियज्ञ  अशा गहन संकल्पनांचा ओझरता उल्लेख येतो ती पुढील अध्यायाची नांदी आहे . ज्ञान विज्ञान आणि अज्ञान यांच्या माऊलीकृत व्याख्या - स्वरूपज्ञान म्हणजे आत्मज्ञान हेच विशुद्ध ज्ञान होय. या ज्ञानाच्या प्रकाशात विज्ञान आणि अज्ञान यांची व्याख्या श्री ज्ञानेश्वर करतात. मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥ स्व-रूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥७-४॥ तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥ त्याप