Posts

Showing posts from April, 2017

प्रवास – ( The Journey, by Tamara )

प्रवास – ( The Journey, by Tamara, born 1960, in Israel. A poet, painter, healer and a teacher. ) मी शपथ वाहते वाहत जाण्याची घेऊन जाऊ देत ते परमतत्त्व मला स्व-च्या सीमेपार. घसरत घरंगळत भराभर निसरड्या उतारांपल्याड मी जाते काळोख्या गुहांच्या आत आत मी खिळून जाते आणि सोनेरी वितळत्या विजेत मुक्त नृत्य करते माझ्या शरीराची काहिली उष्णतेत होत असतानाच. शरीर , माझं शरीर , अचानक तोल सुटलेलं , भयाने गोठलेलं बिचारं. त्याला वाटतं आपण मरणार आता. प्रत्येक पेशी गुणगुणतेय विद्युत्भारित गीत एका भव्य पतंग-कीटकाचं. जळत आत आत माझा चेहरा वितळतोय , वितळतोय वाऱ्यात . धृवप्रदेशीय वारा विझवतो ती आग तरीही जळतोय आतून. पृथ्वी हादरतेय समूळ. मी थरथरते , शहारते , थरकापते , तरंगत राहते. गुरफटते .ढाळली जाते अद्भुत फुलांमध्ये . एक प्रचंड अश्मयुगीन रंगवलेला टोळ , प्रार्थना करणारा , स्तब्ध न्याहाळतो मला. मायाविश्वातील शक्तिशाली वाघ झेपावतोय . माझ्या संज्ञा घट्ट बिलगतात पहाडी घारीच्या पंखांना. धृवप्रदेशीय वारा विझवतोय आग पण

प्रकाश - Of Light : Agha Shahid Ali- एक पद्यानुवाद

प्रकाश - Of Light : Agha Shahid Ali- एक पद्यानुकृती जातेस तू पहाटे जेव्हा नदी नहाते , उजळून आसमंती देहातला प्रकाश प्रेमात हारलेला गवसे मला तिथेच तो मूळ शुद्धरूपी उगमातला प्रकाश " माझ्या न येत कामी जेव्हा निरोपभाषा,मी टाकते गिळून ओठांवरील शब्द" ती हात हालवीते , मार्गस्थ दु:खवेगे मग होत पालखीच्या कोशातला प्रकाश जाळाल ग्रंथ माझा ? पण राख पाठवाच !सांगेन मी जगाला इतकेच शेवटी की त्यांनी मला दिलेला माझ्या फिनिक्सचा हा मरणास मात देवो सरणातला प्रकाश इतिहास वाचताना शिकतात आसवे जे , तात्पर्य वाकुडेसे ते एवढेच होते- की चेहरा मनस्वी करतो विदीर्ण येथे सर्वस्व मागणारा रक्तातला प्रकाश क्षणमात्र अंतरात आला विचार एक , गेला विरून कोठे कळले मलाच नाही प्रॉमेथियस कशाला भोगेल पापदाह आणावयास येथे स्वर्गातला प्रकाश इतकेच ती म्हणाली ,' नावामधून माझ्या हिमरेष गोठलेली उतरून येत असते ' - मी काय सांडली ती कोठेतरी जिथे तो होता किनारलेला काठातला प्रकाश? एकांत साधुनी मी फिरतो असाच दूर जणु शोधतो स्वत:शी परमेशचाहुलींना केव्हाच ना परंतू मी