Posts

Showing posts from September, 2021

आस्तिक्यसूक्तमय अस्तिसूत्र – लेखक सुरेंद्र दरेकर

आस्तिक्यसूक्तमय   अस्तिसूत्र  –  लेखक   सुरेंद्र   दरेकर ‘’ बुड़ता   आवरी   मज  ‘’  या   कादंबरीनंतर     अल्पावधीत   सुरेंद्र   दरेकर   यांचं   दुसरं   पुस्तक  ‘’ अस्तिसूत्र  ‘’  संवेदना   प्रकाशनाकडून   आलं   आहे .  यातही   दोन   दीर्घकथा   किंवा   लघुकादंब - यांचा   समावेश   आहे . पहिली   अस्तिसूत्र   आणि   दुसरी   आरण्यक . अस्तिसूत्र   हे   मध्यवर्ती   आणि   अन्य   विपुल   स्त्रीस्वरांनी   गजबजलेलं   कथासूत्र . . हे   कथेचं   पहिलं   वैशिष्ट्य . कथावस्तु   एका   गतकालाकड़े   निर्देश   करणारी  ,  तीमधील   नायिका   गार्गी   आणि   अन्यही   कथौघातील   स्त्रिया   आपापल्या   परीने   व्युत्पन्न आहेत .  स्थलकालावकाशात   घटना   आणि   पात्रांची ,  त्यांच्या   नातेसंबंध   आणि   स्नेहसंबंध   यांची   जी   संपृक्तता   आहे ,  ती   सुरुवातीला काहीशी  बिचकवणारी   पण   संथपणे   वाचकाच्या   मनात   सामावत   जाणारी     आहे . द्वितीय   वाचनात   तर   तिची   गोडी   लागते . कथानकाला   व्यापून   राहिलेला   अर्थव्यवहार   त्यातील   दुर्व्यवहारांसहित   जाणीवपूर्वक   तपशीलवार   पण   लालित्याला   बाधा   येऊ   न   द