Posts

Showing posts with the label रसग्रहणं

कवयित्री आणि कविता

कवयित्री आणि कविता ‘ ’ The reason we go to poetry is not for wisdom, but for the dismantling of wisdom ‘’   -Jacques Lacan . ‘’My own brain is to me the most unaccountable of machinery - always buzzing, humming, soaring roaring diving, and then buried in mud. And why? What's this passion for?’’ - Virginia Woolf ‘कवीपणा’ हा अस्तित्वाच्या घरात उजळलेला एक स्वयंप्रकाश. एक लिंगदेहातीत ऊर्जास्रोत. अशी स्वत: एक कवयित्री म्हणून माझी धारणा, अनुभूती, निष्ठा. असं असतानाही हा प्रकाश देहाच्याच काचेतून पाझरत बाह्यसृष्टीत अवतरतो तेव्हा त्या देहाची दखल न घेऊन कशी चालेल ? कवयित्री आणि कविता हा एक मोठाच विषय मांडताना स्वत:तल्या त्या कवयित्रीपणाचं लहानसं मुद्दल माझ्याकडे आहे फक्त, मग त्यातूनच मराठी-इंग्लिश कवयित्रींच्या विविध कवितांच्या मुक्त वाचनातून घेतलेला हा प्रेरणांचा, बंधनांचा, निर्मितीतल्या आनंदाचा आणि शिणवटयाचाही शोध.. या लेखाची सुरुवात करताना कवयित्रीचं समग्र ‘असणं’ आणि त्यात वसलेलं कवितांचं बेट याचा विचार सर्वप्रथम माझ्या मनात येतो आहे. कविता काय असते आणि कविता का अ...

भवारण्यसीमेवरल्या हाका - अनोळखी प्रदेशात आणि रे गोपाळा – सुनंदा भोसेकर

भवारण्यसीमेवरल्या हाका - अनोळखी प्रदेशात आणि रे गोपाळा – सुनंदा भोसेकर एका स्वायत्त प्रातिभ-प्रदेशात तिला भेटण्यासाठी जावं लागतं. तशी ती सभासमारंभात नसते असं नाही. पण तिच्याच शब्दातही ती सापडेल असंही नाही.तिच्यापर्यंत पोचण्याच्या परवलखुणा शोधताना तिला विसरायला हरकत नाही अशा एका प्रांताचं बांधकाम तिने फार पूर्वीपासून सुनियोजितपणे केलं आहे.तिथेच आपण तिच्या हाका ऐकत मग स्वत:लाही विसरून जावं . समकालीन कवयित्रींपैकी एक महत्वाचं नाव- सुनंदा भोसेकर. खूप पूर्वी १९८० मध्ये हातात आला होता तो तिचा ऋचा प्रकाशनकडून आलेला संग्रह –‘’ अनोळखी प्रदेशात ‘’आणि नंतर २००७ मधला ‘’रे गोपाळा ‘’- दोन्ही आता परममित्र प्रकाशनची प्रकाशने आहेत. ‘’अनोळखी प्रदेशात ‘’मधली सुनंदा जेमतेम विशी ओलांडलेली असेल. पण कवितेतली जाणीव तेव्हाही प्रगल्भ.जिच्या लेखनप्रपंचाची सुरुवातच विश्वरहस्याने झाली, तिचं वय कसं ठरवावं ? ‘’हिमार्त वादळी पानझडींचे हिशेब आठवत | आपण आपले विश्वरहस्यासारखे |घोर एकांतिक होऊन जावे हेच बरे.’’ या पहिल्या कवितेच्या पहिल्या ओळीतच तुडुंब एकटेपण, गूढता आणि असीमता   सामावून सुनंदान...