Posts

Showing posts from 2019

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद – शहराची पलिकडची बाजू ..अवशेषांचे राज्य दिसे ओसाडीतील पडक्या विहिरीमधे गार काळोख वसे या अंधारी कुहरामध्ये खोल खोल हलते पाणी उतरत जाती आत पायऱ्या शिळ्या जळी त्या पूर्णपणी जणू मिळेना प्रमाण एखाद्या गोष्टीचे तरी कळे खूप खोल जाणारे काही गूढ तथ्य येथेच मिळे स्तब्ध उभे औदुंबर विहिरीस वेढत फांद्यांचे जाळे घुबडांच्या घरट्यांचे लोंबत भुरे रिते त्यातच गोळे जणू शेकडो पुण्यांचा आभास विजेचा चमकारा त्यातच मिसळे हिरवा कच्चा रानातील गंधित वारा या साऱ्यांतून आशंका कसल्याशा हृदयाला डसती घडून गेल्या रहस्यमयशा महानतेची अर्धस्मृती काठावरती टेकत हिरवे सुंदर कोपर बसलेली दिसते आहे तगर तारका-फुले पांढरी ल्यालेली तिच्यालगतची कण्हेर माझी लालबहर जी पाजळते धोक्याच्या एका बाजूला मला खुणावून बोलवते विहिरीचे उघडे काळे मुख आकाशा न्याहळे उगा खोल गूढ शून्यातच एका ब्रह्मसमंधाची जागा.. घुमती तेथे प्रतिध्वनिंचे प्रतिध्वनी गडबडलेले वेडे शब्दच..गहन अर्थ पण ते अनुमानापलिकडले क्षणक्षण तो घासे देहाला करे मलिनतेला साफ कसल्याशा पापाच्

स्वागतगीत – Song of Welcome-जोसेफ ब्रॉडस्की -रशिया

जोसेफ ब्रॉडस्की ( Joseph Brodsky) रशिया नोबेल १९८७ स्वागतगीत – Song of Welcome ही तुझी आई आणि तुझे बाबा सोबत त्यांच्या रक्तमांसाचा तू म्हणून तुझं स्वागत ! का तुझ्या चेहऱ्याची पण उडालीय रंगत ? हे आहे तुझं जेवण आणि हे पेय नंतर करायचाच तर थोडासा विचारही कर स्वागत , हे सगळं आहे तुझंच तर ! ही घे तुझी पाटी .. आहे बरीचशी कोरी स्वागत तुझं , थोडासा उशीर झालाय जरी स्वागत , असू दे रे , आपलं कसलंतरी . हा तुझा पगाराचा चेक , आणि हे घरभाडे पांचवं मूलतत्त्व पैसा ! आहे का हे थोडे ? पैपैशासाठी तुझे स्वागत लाडेलाडे .. हा तुझा थवा आणि हे मोठ्ठे मध-पोळे स्वागत !पन्नासेक लाखांचे आहेत इथे गाळे एकमेकांसारखे तुम्ही , कुणी ना निराळे. स्वागत ! फोनबुकात तुझ्या नावापुढे चांदणी लक्ष्य लोकशाहीचे या आकड्यांची छुपी रेखणी स्वागत ! कीर्तीची ही खूण तुला वाटे देखणी . हे तुझं लग्न , आणि हा तुझा काडीमोड क्रम बदलणे अशक्यच ते , जाऊ दे रे सोड ! स्वागत तुझे !तुलाच ना हे वाटत होते गोड .. हे घे तुझं ब्लेड आणि हे आहे तुझं मनगट स