हे सेतुराज! To Brooklyn Bridge- BY HART CRANE- एक पद्यानुवाद


To Brooklyn Bridge- BY HART CRANE-

एक पद्यानुवाद


https://soundcloud.com/bharati-birje-diggikar/kygxvllhjs3r


पहाटे- पहाटे तरंगात खेळे नवा गारवा शांत विश्रांतसा

विसावून पंखांस झेपावतो हा समुद्री ससाणा पुन्हा उंचसा

असा वेगवेडी खुळी रिंगणे शुभ्र सांडीत हा दूर झेपावतो     

जणू मुक्ततेचेच प्रारूप बंदिस्त खाडीजळाच्या नभी बांधतो    



भरारीतली वर्तुळे पूर्ण रेखीत जातो दिठीलाच ओलांडुनी  

जशी भास-शी ही शिडे दूर अंधूक दिसतात जातात पाण्यातुनी

..चला शुभ्र पाने भरू आकड्यांनी-करूया व्यवस्थितशा  फायली

सरे आजचा दीस : आम्हांस ओतेल ही लिफ्ट कार्यालयाच्या तळी





सिनेमातल्या भव्य-विस्तीर्ण दृष्टीभ्रमांचे मला घेरती आठव 

पुढे वाकलेली हजारो मनुष्ये असे दृश्य: जादूभरे लाघव

कधी ना कुणाला रहस्ये कळाली , नवे लोक येती तरीही पुन्हा

खिळावे पुन्हा मंत्रमायेस डोळे असा खेळ जो रोज संपेच ना



  

इथे बंदराला रुपेरी गतीने तुझ्या पायऱ्या दीर्घ ओलांडती  

जणू सूर्य येथून आताच गेला झपाटाच तो राहिला मागुती

स्थितीला गतीचाच लाभे उफाडा तुझे या प्रकारातले चालणे  

तुझ्या मुक्ततेचे प्रतिरूप आहे तुझे याठिकाणी असे थांबणे  





कुण्या दूरच्या-शा बिळातून ये, की भुयारात होता कळेना कसे  

असा एक वेडा तुझ्या भव्य कठड्याकडे भर्भरा चाललेला  दिसे  

झुके तो पुढे - त्याक्षणी शर्ट त्याचा फुगा होत गेला पिसाटे हवा  

पडे कोसळे वाकलेला खुळा तो!  मुक्याने पुढे चालला कारवा  



तुझ्या उंच खांबांत मध्यान्ह झरते उन्हे थेट रस्त्यावरी पोचती

नभ:दीप्तिचा दात खाली गळावा झळाळी तशी पाजळे खालती   

दुपारी इथे संथ फिरतात याऱ्या घुसाडून माथा ढगांच्या उरा

तुझ्या साखळ्या शांत स्फुरतात भरतात श्वासांमध्ये उत्तरी सागरा



जशा स्वर्गसंकल्पना ज्यू पुराणांतरी गूढशा घेरती सावल्या

तशा या अगम्या कृपा तू उदारा आम्हा सर्व लोकांवरी वर्षिल्या

जथे माणसांचे अनामीक झाले अखंड प्रवास-प्रवाही तुझ्या   

जमे जे न काळास ते तू दिलेले : क्षमापूर्ण चैतन्य आणि दया  



अगा तंतुवाद्या! प्रकोपी धगीने तुला सांधलेले असावे कुणी 

तुझ्या सर्व तारा नव्हे जोडणे शक्य सामान्य काबाडकष्टातुनी

भयाकारसा पायथा रे तुझा हा कुण्या प्रेषिताची प्रतिज्ञाच ही 

कुण्या पोरक्याची जणू प्रार्थना ही कुण्या प्रेमिकाची असे हाय ही  





दिवे पोहती वाहनांचे जणू हा अखंडीत तू शब्द उच्चारला    

नक्षत्रलोकातला दीर्घ निष्पाप नि:श्वास वाटे इथे सांडला

पथातून आहे तुझ्या ओवली पूर्ण संपृक्तता या अनंतातली 

तुझ्या बाहुपाशात – आम्ही पहातो- कशी रात्र आहेस तू पेलली



तुझ्या सावलीला इथे थांबलो याच खांबांमध्ये मी असा आजला

चढे रात्र अंधार वाढे तशी ही तुझी सावली स्पष्ट होते मला

प्रकाशीत चौकोन- एकेक पुडके विझे दूर वस्तीत शहरातले

हिमाचा तडाखा असा वाढला की तळाशी दबे लोह वर्षातले



अगा जागणाऱ्या ! जशी जागते ही नदी वाहणारी तुझ्या खालती

समुद्रास लांघून न्याहाळशी भव्य भूभाग स्वप्नात जे लोपती

आम्हा क्षुद्र जीवांमध्ये या तळाला उभारून यावेस तू सर्वथा   

तुझ्या भव्य वलयामध्ये सार्थ व्हावी पुन्हा एकदा ईश्वराची कथा



-     भारती बिर्जे डिग्गीकर



How many dawns, chill from his rippling rest

The seagull’s wings shall dip and pivot him,

Shedding white rings of tumult, building high

Over the chained bay waters Liberty—

 



Then, with inviolate curve, forsake our eyes   

As apparitional as sails that cross

Some page of figures to be filed away;

—Till elevators drop us from our day ...







I think of cinemas, panoramic sleights

With multitudes bent toward some flashing scene

Never disclosed, but hastened to again,

Foretold to other eyes on the same screen;





And Thee, across the harbor, silver paced

As though the sun took step of thee yet left

Some motion ever unspent in thy stride,—

Implicitly thy freedom staying thee!



Out of some subway scuttle, cell or loft

A bedlamite speeds to thy parapets,

Tilting there momently, shrill shirt ballooning,

A jest falls from the speechless caravan.





Down Wall, from girder into street noon leaks,

A rip-tooth of the sky’s acetylene;

All afternoon the cloud flown derricks turn ...

Thy cables breathe the North Atlantic still.







And obscure as that heaven of the Jews,

Thy guerdon ... Accolade thou dost bestow

Of anonymity time cannot raise:

Vibrant reprieve and pardon thou dost show.







O harp and altar, of the fury fused,

(How could mere toil align thy choiring strings!)

Terrific threshold of the prophet’s pledge,

Prayer of pariah, and the lover’s cry,





Again the traffic lights that skim thy swift

Unfractioned idiom, immaculate sigh of stars,

Beading thy path—condense eternity:

And we have seen night lifted in thine arms.





 

Under thy shadow by the piers I waited

Only in darkness is thy shadow clear.

The City’s fiery parcels all undone,

Already snow submerges an iron year ...





O Sleepless as the river under thee,

Vaulting the sea, the prairies’ dreaming sod,         

Unto us lowliest sometime sweep, descend

And of the curveship lend a myth to God.



 

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग