लैला फॉरटिएर यांच्या ‘’ Heart beat’’ – या शिल्पित कवितेचा मी केलेला पद्यानुवाद ‘’हृदयस्पंदन ‘’
लैला फॉरटिएर यांच्या ‘’ Heart beat ’’ – या शिल्पित कवितेचा मी केलेला पद्यानुवाद ‘’हृदयस्पंदन ‘’ तू आहेस माझ्या अस्थिमज्जेत पसरणारा विराम माझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये-माझ्या श्वासांच्या कुजबुजीवर अंथरलेल्या एका विश्वाचं वस्त्र– आपल्यात अंतर नाही जराही उरलेलं स्थळकाळ थबकतात जिथे,तिथेच आपण एकमेकांमध्ये खाक होत जातो अस्तित्वाच्या पापुद्र्यांच्या प्रदेशात–प्रत्येक प्रतिध्वनीच्या तरंगाच्या प्रभावात आणि चाचपतो – जिथे बोटं शोधत जातात मला ज्ञात नसलेल्या जागा स्पर्शल्या जातात हळुवार जाग फुटावी तशा मर्दनात – मी मिटून घेते पापण्यांची झापडं माझ्या अपश्य जाणिवेत पावित्र्य रोखून धरत मी शिल्लक राहणार नाही या रात्रीतून या पेयाशिवाय..तुझ्या वर्षावाच्या – मी झाले आहे दूध आणि पाऊस दोन्ही जरी माझी तृषा शमवायला तुझ्याशिवायच या ऊर्ध्वपातित मधाळ चमकत्या अमृताने तुझ्या स्वत:च्या क्षुधेचं पात्र- पी मला आणि मुक्त हो या दाहातून -वेदनेतून प्रत्येक क्षणाच्या आसुसलेल्या तुझ्या त्या स्पर्शाला ...