लैला फॉरटिएर यांच्या ‘’ Heart beat’’ – या शिल्पित कवितेचा मी केलेला पद्यानुवाद ‘’हृदयस्पंदन ‘’


             लैला फॉरटिएर यांच्या ‘’ Heart beat’’ या शिल्पित कवितेचा मी केलेला पद्यानुवाद ‘’हृदयस्पंदन ‘’

तू आहेस माझ्या अस्थिमज्जेत पसरणारा विराम
माझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये-माझ्या श्वासांच्या कुजबुजीवर
अंथरलेल्या एका विश्वाचं वस्त्र– आपल्यात अंतर नाही जराही उरलेलं
स्थळकाळ थबकतात जिथे,तिथेच आपण एकमेकांमध्ये खाक होत जातो
अस्तित्वाच्या पापुद्र्यांच्या प्रदेशात–प्रत्येक प्रतिध्वनीच्या तरंगाच्या प्रभावात
आणि चाचपतो – जिथे बोटं शोधत जातात मला ज्ञात नसलेल्या जागा
स्पर्शल्या जातात हळुवार जाग फुटावी तशा मर्दनात – मी मिटून घेते
पापण्यांची झापडं माझ्या अपश्य जाणिवेत पावित्र्य रोखून धरत
मी शिल्लक राहणार नाही या रात्रीतून या पेयाशिवाय..तुझ्या
वर्षावाच्या – मी झाले आहे दूध आणि पाऊस दोन्ही जरी
माझी तृषा शमवायला तुझ्याशिवायच या
ऊर्ध्वपातित मधाळ चमकत्या अमृताने
तुझ्या स्वत:च्या क्षुधेचं पात्र-
पी मला आणि मुक्त हो
या दाहातून -वेदनेतून
प्रत्येक क्षणाच्या
आसुसलेल्या
तुझ्या त्या
स्पर्शाला
 ते
-धडाडते स्पंदन-
त्या
छोट्या
मरणांच्या
जोडपेशींचे ज्या
वळतात एकमेकींवर
लोटतात शहारणारं रूपं
जे फुटतं आणि विखुरतंच शेवटी
वैश्विक विरामावर आणि पुन्हा जन्म
घेण्याआधी पुनश्च अधिक खोल रुतत जातं
श्वास घेत रक्त आणि ऊर्जेचे – घास भराभर
अग्निजन्य खडकाचे काळ्या मद्यासोबत प्राशलेले वेढून
प्रतिध्वनीची कुजबूज आणि मागोवा खोल कोसळत जागृतीत
प्रत्येक क्षणाच्या – ते अलौकिक शोभिवंत फळ जे स्वत:चीच
सालं उतरवतं उघडं होण्यासाठी प्रकाशासमोर– एक देवच 
जाणतो मला पुन्हा नग्न व्हायचंय..फक्त तुझ्यासाठी



heart beat

You are the pause settling into the marrow
Of my heart’s beat~ The fabric of a universe upon the
Whisper of my own breath~ There is no distance between us
In the lapse of time and space~ We are consumed one within the
Other into layered realms of being~ The rippled effect of each echo
& trace~ Where fingers have wandered into places I knew not could
Be touched~ Massaged into a tender breaking of waking~ I close my
Venetian eyes~ Holding in the sacred with my unseen understanding
I will never survive the night without this drink…Without your
Pouring~ I have become both milk and rain if only to
Slake myself without you~ Distilled into this
Honeyed ambrosia~ Glistening from
The bowl of your own hunger~
Partake of me and relieve
This fever~ This ache
Of every moment
Left starved
Of your
Touch
The

~Quickening Pulse~

Of
Little
Deaths
Double-helix
Spirals ambient
Rush shivering silver
Only to shatter into some
Cosmic pause before being born
Once again into deeper penetrations~
Breathing blood and vitality~ Ingested into
Obsidian~ Swallowed in merlot~ The enveloping
Susurrus of echo and trace falling deep into waking
Every moment- The fruit of splendor shedding its own
Skin that it may be revealed to the light~ God alone
Knows I want to be naked again…If only for you


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग