Posts

Showing posts from December, 2017

प्रभात –गान (Aubade: : Philip Larkin यांच्या इंग्लिश कवितेची पद्यानुकृती)

प्रभात –गान ( Aubade : : Philip Larkin   यांच्या इंग्लिश कवितेची पद्यानुकृती) दिवसभराचं काम. रात्री जराशी नशा करतो      पहाटेचे चार. शांत अंधारात मी टक लावतो. पडद्यांच्या कडा आता उजळत जातील हळूहळू   नेहमी वाट पाहणारं सत्य मला यावेळी येतं कळू अविश्रांत मृत्यू अजून एका दिवसाने जवळ आलाय   कधी आणि कसा मी मरणार? दुसरातिसरा सुचत नाही विचार . ओसाडओसाड प्रश्न. मरणाचे मरण्याचे भयाकार       तळपतात पुन्हा,दिपवतात,घाबरवतात धुवांधार. मन कोरं होतं स्वच्छ त्या तेजात -न पश्चात्ताप, -राहून गेलेलं भलं करणं,प्रेम करणं, आणि मग वेळ असातसा दवडणं- न दु:खदाहही या सर्वाचा कारण हे आयुष्य एकुलतं चुकीच्या ठिकाणाहून निघतं, धडपडतं, कष्टाने चढतं.          कदाचित कधीच नाही यातून सावरणार ते असंच समग्र निरंतर शून्यतेमध्ये विरणार ते आपण प्रवास करत पोचतो याच निर्मूलतेकडे हरवतो. शिल्लक ना राहतो इकडे, ना तिकडे . लवकरच.याहून काय आहे खरं ? याहून काय अधिक भयंकर...

महाकवी कालिदास ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१० एक पद्यानुवाद

महाकवी कालिदास (चौथे शतक) ऋतुसंहार काव्ये शरदऋतूवर्णन - श्लोक १-१०   एक पद्यानुवाद   (सद्भारती वृत्त)     तृणांचे चंदेरी वसन ; कमळासारखे रूप उमले     खुळ्याशा हंसांचा ध्वनि नुपुर की आसमंतात घुमले     हिची काया की ही लवचिकपणे पक्व साळी लहरते    वधू आली येथे शरद-रमणी मुग्ध नारी विहरते   || रुप्याच्या वर्खाने कुरण सजले चांदणी रात्र बहरे   जळी हंसक्रीडा- कमलकलिका शुभ्रसौंदर्य विखरे   फुले जाई, कोठे दिसत कदली सातपानी धवलशी   फुलांचे हे सारे उपवन धरे सौम्य आभा विमलशी   || जळाशी मासोळ्या उसळत जशी मेखलांची चमक ती किनाऱ्याला पक्षी विहरत जणू शुभ्रमाळाच रुळती   नितंबांच्या पुष्टीसम दिसत या गोल विस्तीर्ण पुळणी नद्या गर्वोन्मत्ता निघत जणु की धुंद तंद्रीत रमणी    रुपेरी शंखाची चमक, कमळाचे कुठे देठ ढवळे   छटा आकाशाच्या तरल असल्या पाहता   दृष्टि निवळे सरे वर्षावाचे वजन, हलके मेघ वाऱ्यात फिरती    जणू छत्रे राजावर हळुहळू शुभ्र नाजूक ...