कवयित्री आणि कविता
कवयित्री आणि कविता ‘ ’ The reason we go to poetry is not for wisdom, but for the dismantling of wisdom ‘’ -Jacques Lacan . ‘’My own brain is to me the most unaccountable of machinery - always buzzing, humming, soaring roaring diving, and then buried in mud. And why? What's this passion for?’’ - Virginia Woolf ‘कवीपणा’ हा अस्तित्वाच्या घरात उजळलेला एक स्वयंप्रकाश. एक लिंगदेहातीत ऊर्जास्रोत. अशी स्वत: एक कवयित्री म्हणून माझी धारणा, अनुभूती, निष्ठा. असं असतानाही हा प्रकाश देहाच्याच काचेतून पाझरत बाह्यसृष्टीत अवतरतो तेव्हा त्या देहाची दखल न घेऊन कशी चालेल ? कवयित्री आणि कविता हा एक मोठाच विषय मांडताना स्वत:तल्या त्या कवयित्रीपणाचं लहानसं मुद्दल माझ्याकडे आहे फक्त, मग त्यातूनच मराठी-इंग्लिश कवयित्रींच्या विविध कवितांच्या मुक्त वाचनातून घेतलेला हा प्रेरणांचा, बंधनांचा, निर्मितीतल्या आनंदाचा आणि शिणवटयाचाही शोध.. या लेखाची सुरुवात करताना कवयित्रीचं समग्र ‘असणं’ आणि त्यात वसलेलं कवितांचं बेट याचा विचार सर्वप्रथम माझ्या मनात येतो आहे. कविता काय असते आणि कविता का अ...