Posts

Showing posts from February, 2021

अस्तित्वभानाचं अर्घ्य -''बुडता आवरी मज..’’ सुरेन्द्र दरेकर

‘’बुड़ता आवरी मज..’’या संवेदना प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या संग्रहात सुरेन्द्र दरेकर यांच्या दोन दीर्घकथा आहेत. कथा हा फॉर्म असला तरी त्यांची एकूण संपृक्तता दोन कादंब-यांचा ऐवज असलेली अशीच आहे. समकालीन मराठीतील अतिशय समृद्ध असा अस्तित्वानुभव देणा-या अशा या कथा आहेत. दोन्ही कथांचे नायक विज्ञान तत्त्वज्ञान आत्मज्ञान या रूढ श्रेणींच्या पलिकडे जात एका प्रबुद्ध अशा निर्वातात विसावताना जाणवतात. या प्रवासातले त्यांचे सहप्रवासीही अनेक प्रकारचे असले तरी आत्मिक विकासाच्या सहसंवेदना उलगडणारे प्रगल्भ विज्ञान-तत्वज्ञानी गुरु,तितक्याच क्षमतेचे गुरुतुल्य मित्र,सुहृद-स्नेही, प्रिय व्यक्ती यांची गजबज त्यात आहे. या प्रवासातली साधी नोकरमाणसंही साधी नाहीत ( क्रमश: आरती, झेनाबी )कारण नायकांच्या विकसित अंतर्दृष्टीच्या झोतात त्यांच्यातलेही हिरोइक पैलू झळाळून उठतात.  ‘’बुडता आवरी मज ‘’ मधले बाबा (यशवंत )आणि ‘’पॉईज’’मधला महेश यांच्यात काही साधर्म्यस्थळे आहेत. हे नायक किंवा protagonist एकेकाळच्या संपन्न आणि आता पड़झड होत चाललेल्या मोठ्या संयुक्त कुटुम्बाच्या पसा-यात वाढलेले आहेत. बाबांच्या स्वभावात एक ...