हिवाळ्यातल्या वाऱ्या रे !- Blow, blow thou winter wind- Willliam Shakespeare
हिवाळ्यातल्या वाऱ्या रे ! -“Blow, blow, thou winter wind” - William Shakespeare हिवाळ्यातल्या वाऱ्या रे !ये ये वादळवेगाने माणसातल्या कृतघ्नतेहुन ना निर्दय तू,मी जाणे जरी झोंबतो अंगांगा तुझा श्वास हा खरखरता निराकार फिरणारा तू - दंशही तुझा वरवरचा हैया हो !मग गात फिरू! हिरव्या रानामध्ये शिरू : मैत्र भ्रम असे एक इथे , प्रेम मूर्खता - मनी धरू : तर मग हैया हैया हो ! जीवनात मस्ती राहो ! कडवट आकाशा शिशिरी गोठवशील का तू इतके विस्मृत उपकारापुढती असले चावे पडत फिके पाण्याला गोठवशील तू तरीही नांगी तुझी बरी मित्राला विसरून जाणे जखम खोलवर अधिक करी हैया हो !मग गात फिरू! हिरव्या रानामध्ये शिरू : मैत्र भ्रम असे एक इथे, प्रेम मूर्खता - मनी धरू : तर मग हैया हैया हो ! जीवनात मस्ती राहो ! भारती .. Blow, blow, thou winter wind, Thou art not so unkind As man’s ingratitude; Thy tooth is not so keen, Because thou art not seen, Although thy breath be rude. Heigh-ho! sing, heigh-ho! unto the green holly: Most friendship is feigning, most loving mere folly: T...