कुब्ला खान -एक खंडित स्वप्नदृश्य Kubla Khan Or a Vision in a Dream. A Fragment- by Samuel Taylor Colerigde


कुब्ला खान -एक खंडित स्वप्नदृश्य

Kubla Khan Or a Vision in a Dream. A Fragment-  by Samuel Taylor Colerigde






झनाडू  नाव आहे एका राजविलासी भव्य प्रासादाचं 

कुब्ला खानाच्या फर्मानातून झालं होतं निर्माण त्याचं

जिथे पवित्र आल्फ नदी अगणित गुहांमधून वाहात

झुळझुळत उतरत लोपते शेवटी एका सूर्यहीन समुद्रात

दहा मैल पसरलेला तो सुपीक जमिनीचा विस्तार

तटबंदी चौबाजूंनी त्यातच मनोरेही उभे राखणदार

बगीच्यांमध्ये कालव्यांची नसांसारखी जाळी चमके

बहरलेल्या झाडांचे सुगंध काठांवर. 

टेकड्यांइतक्या जुन्या वनांत उन्हेरी हिरवळ-ठिपके.          



पण हाय !एक मोहक तिरपी दरी आता पुढे दिसते

गर्द डोंगरउतारांवरचे देवदार जी आरपार छेदत जाते 

भयविश्वच असावं हे मंत्रभारलेलं. क्षीण चंद्राखाली

कुणी स्त्री तिच्या राक्षस प्रियकराला जणू साद घाली.


याच दरीत अखंड कसली खळबळ घुसळत वाहे 

गडद धुके नेसून पृथ्वी जणू इथे धपापत आहे 

झरा मोठा फुटला आहे इतक्या शक्तीनिशी 

त्याच्या त्या आवेगाने भूमी फाटत जाते जशी  

गारा तडतड पडती तसे मोठे पाषाणाचे तुकडे

मुसळाखालच्या धान्यासारखे उडती इकडेतिकडे

पाषाणांचे अखंड नर्तन चाले असे तिच्याभवती

पवित्र ती नदी भासे जणू उचलली जाते वरती



पाच मैलांचा भूलभुलैया ..हा चकवा राहे चालत 

अरण्य आणि दरीमधून पवित्र नदी जाते वाहत

माणूस मोजू शकत नाही अशा गुहांपाशी ती पोचे

मृत समुद्रात उसळते पाणी शेवटी शांत होते तिचे

याच खळबळीत दूरवरून येणारे आवाज पूर्वजांचे

ऐकले कुब्लाने , भविष्य वर्तवत होते ते युद्धाचे ..



त्याच्या विलासी राजप्रासादाच्या घुमटाची सावली

पाणलोटांवरती तरळत तरंगत राहते वर-खाली

कोलाहलामध्ये साऱ्या ती छायाही अलगद मिसळे

झऱ्याचे आवेग, गुहांचे घुमणे त्यातच तीही निथळे

असले लोकविलक्षण दृश्य दिसते कुठेतरीच क्वचित  

उन्हात चमकणारा विलास-घुमट, गुहा बर्फाच्छादित!



एक मुलगी तंतुवाद्य छेडतछेडत  गाणारी   

मला भासामध्ये दिसून गेली होती कधीतरी 

अबिसिनीया देशामधील असावी ती युवती 

अबोरा पर्वताची गाणी छेडत वाद्यावरती

ती धून ते गाणे ! काय पुन: मला जमेल ?

माझ्या आत जागवणे ते असे काही घडेल ?

प्रेरित होईन मीही असल्या खोल आनंदाने 

दीर्घ वरच्या पट्टीमध्ये आळवण्यास्तव गाणे

ज्यातून मी साकारेन घुमट अवकाशात,पाहा:

उन्हात चमके विलास-घुमट,बर्फाच्छादित गुहा!

ऐकतील माझे गाणे त्यांना दिसेन मी,तो प्रांत

आणि त्यांनी ओरडावे , ‘’सांभाळा ! हा हन्त !

याचे डोळे अंगारलेले ,याचे केस फिस्कारलेले !

अशा प्राण्याभोवती रेखावी आधी तीन वर्तुळे!

मिटून घ्यावे प्राणभयाने नंतर आपले डोळे !

कारण पोसला आहे हा दंव आणि मधावरती

स्वर्गातले दूध पिऊन झाली आहे त्याची तृप्ती..’’




 -
-पद्यानुवाद – भारती..







In Xanadu did Kubla Khan
A stately pleasure dome decree:
Where Alph, the sacred river, ran
Through caverns measureless to man
Down to a sunless sea.

So twice five miles of fertile ground
With walls and towers were girdled round:
And there were gardens bright with sinuous rills,
Where blossomed many an incense-bearing tree;
And here were forests ancient as the hills,
Enfolding sunny spots of greenery.


But oh! that deep romantic chasm which slanted
Down the green hill athwart a cedarn cover!
A savage place! as holy and enchanted
As e'er beneath a waning moon was haunted
By woman wailing for her demon lover!

And from this chasm, with ceaseless turmoil seething,
As if this earth in fast thick pants were breathing,
A mighty fountain momently was forced:
Amid whose swift half-intermitted burst
Huge fragments vaulted like rebounding hail,
Or chaffy grain beneath the thresher's flail:
And 'mid these dancing rocks at once and ever
It flung up momently the sacred river.

Five miles meandering with a mazy motion
Through wood and dale the sacred river ran,
Then reached the caverns measureless to man,
And sank in tumult to a lifeless ocean:
And 'mid this tumult Kubla heard from far
Ancestral voices prophesying war!

The shadow of the dome of pleasure
Floated midway on the waves;
Where was heard the mingled measure
From the fountain and the caves.

It was a miracle of rare device,
A sunny pleasure-dome with caves of ice!

A damsel with a dulcimer
In a vision once I saw;
It was an Abyssinian maid,
And on her dulcimer she played,
Singing of Mount Abora.

Could I revive within me
Her symphony and song,
To such a deep delight 'twould win me,
That with music loud and long,
I would build that dome in air,
That sunny dome! those caves of ice!

And all who heard should see them there,
And all should cry, Beware! Beware!
His flashing eyes, his floating hair!
Weave a circle round him thrice,
And close your eyes with holy dread,
For he on honey-dew hath fed,
And drunk the milk of Paradise.


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग