Posts

Showing posts from September, 2022

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय  पंधरावा- पुरुषोत्तमयोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय-अध्याय पंधरावा- पुरुषोत्तमयोग- "पुरुषोत्तम" म्हणजे साक्षात ईश्वराचे नाव धारण करणारा हा अध्याय. यात प्रपंचरुपी वर ब्रह्मात मुळे असलेल्या व खाली विस्तारलेल्या अश्वत्थवृक्षाचे भव्य उदात्त असे रूपक आहे, ज्याचा अधिकच अद्भुतरम्य विस्तार ज्ञानदेवांनी आपल्या शैलीत केला आहे. त्यातच जन्मोजन्म अविरत भरकटणाऱ्या जीवात्म्याचे  चित्रण तशाच प्रतिभाश्रीमंत शब्दात या अध्यायात आले आहे .या सर्वावर पसरलेल्या प्रभुप्रभावाचे विश्लेषण आहे, आणि सर्वात शेवटी या विचित्र संसारनगरात राहणाऱ्या क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या पुरुषांचे आकलन आहे. आपल्या नेहमीच्या रीतीनुसार गुरुपूजनाने ज्ञानदेवांनी अध्यायनिरूपणाची सुरुवात केली आहे. माऊलींनी केलेली श्रीगुरुंची मानसपूजा- गीतेच्या प्रत्येकच अध्यायाच्या निरूपणाची सुरुवात श्रीगुरुपूजनाने ज्ञान देवांनी केलेली आहे, असे असले तरी या पंधराव्या अध्यायाच्या आरंभीच्या ज्ञानेश्वरांच्या श्रीगुरुमानसपूजनाच्या ओव्या या मानसपूजेचा वस्तुपाठ म्हणाव्यात अशा आहेत. प्रीतीयुक्त भक्तीची चरम सीमा ज्ञानेश्वरांनी इथे गाठलेली आहे. आतां हृदय हें आपुलें । च

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय चौदावा- गुणत्रयविभागयोग

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय चौदावा- गुणत्रयविभागयोग तेराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी सर्व जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संगाने कसे झाले आहेत या प्रमेयाचे प्रतिपादन केले ,तर आत्म्यासारख्या असंगाला मायेचा संग कसा घडतो ?हा सुखदुःख भोगतो की गुणातीत आहे? गुण कोणते ?किती ?त्यांच्या बंधनाचे स्वरूप कोणते ?  गुणातीताची लक्षणे काय आहेत ?- हे सर्व विवेचन चौदाव्या अध्यायात म्हणजेच गुणत्रयविभागयोगात येते. चौदाव्या अध्यायाचा मागील अध्यायाशी संबंध पुढील ओव्यामध्ये स्पष्ट झालेला आहे- तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञायोगु । सुखदुःखादि भोगु । केवीं तया ? ॥ ३५ ॥ गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । नातरी गुणातीतीं । चिन्हें काई ? ॥ ३६ ॥ एवं इया आघवेया । अर्था रूप करावया । विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥ ३७ ॥ अध्यायाच्या आरंभीचे श्री गुरुस्तवन या अध्यायाच्या आरंभी आपल्या नित्य रीतीला अनुसरून श्री ज्ञानरायांनी सद्गुरूंचे स्तवन मांडले आहे.सद्गुरूंचे स्वरूप विविध विशेषणे व संबोधनांच्या वर्षावातून त्यांनी वर्णिले आहे. हे सद्गुरु समस्त देवगणांचेही आचार्य आहेत. प्रज्

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय तेरावा -क्षेत्रक्षेत्रज्ञयोग

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य  परिचय- अध्याय तेरावा -क्षेत्रक्षेत्रज्ञयोग ज्ञानदेवांनी मांडलेल्या देहाला क्षेत्र म्हणण्यामागील विविध भूमिका तेराव्या अध्यायाच्या प्रारंभी या देहाला क्षेत्र म्हणण्यामागील विविध सिद्धान्त भूमिका श्रीज्ञानदेव स्पष्ट करतात. या एवढ्याशा साडेतीन हात देहामुळे जगाचे व्यापारव्यवहार चाललेले आहेत, शास्त्रांचे परस्परसंबंध जुळलेले आहेत.हे कोणाचे स्थान आहे?सुपीक  की नापीक? हें क्षेत्र का म्हणिजे । कैसें कें उपजे । कवणाकवणीं वाढविजे । विकारीं एथ॥ ११ ॥ हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें । बरड कीं पिके । कोणाचें हें॥ १२ ॥ ज्ञानदेव इषत् विनोदबुद्धीने म्हणतात," पण घरोघरी जो तो 'हे माझे' म्हणून डोके बडवून घेत आहे. नास्तिक, वैदिक व दिगंबरवाद्यांच्याही वादसभांचे हे एकच खाद्य आहे." तोंडेसीं तोंडा न पडे । बोलेंसीं बोला न घडे । इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥ १७ ॥ नेणों कोणाचें हें स्थळ । परि कैसें अभिलाषाचें बळ । जे घरोघरीं कपाळ । पिटवीत असे ॥ १८ ॥ असा हा देह तत्त्वतः क्षेत्र म्हणजे शेत आहे. त्याला जाणणारा जीव हा क्षेत्रज्ञ आहे. पण येथेही मतभ