Posts

Showing posts from July, 2022

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय दहावा -विभूतियोग

ज्ञानेश्वरी परिचय -अध्याय दहावा -विभूतियोग ज्ञानदेवकृत श्रीगुरुमहिमान गीतेच्या उत्तरखंडाला दहाव्या अध्यायापासून प्रारंभ झाला आहे.आतापर्यंत संपन्न झालेल्या अर्ध्या महायात्रेचा आनंद श्रीज्ञानदेवांच्या मनातून व शब्दातून या अध्यायाच्या आरंभी ओसंडला आहे. हेच या अध्यायारंभीच्या गुरूमहिमानाचे मुख्य निमित्त. प्रथमच श्रीगुरुंना संस्कृतप्रचुर विशेषणांचा त्यांनी अभिषेक घडवला आहे. दहाव्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत याचे सौंदर्यपूर्ण प्रत्यंतर येते. नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥ स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमळाचा विकास करणार्‍या व परावाणीचा विषय (स्वरूपस्थिती) या रमणीशी विलास करणार्‍या श्रीगुरो, तुम्हाला माझा नमस्कार असो. "स्पष्ट बोध करण्यात कुशल", "विद्येचे कमळ उमलविणारा सूर्य", "प्रकृतीरुपी स्त्रीसह विलास करणारा","संसारांधकारास नाशणारा सूर्य", " अत्यंत तरुण तूर्येचे लालन करणारा", "अखिल जगत्पालक"," मंगल रत्नभांडार"," सज्जनांच्या वनातील चंदनवृक्ष" अशी