ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग
ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग 'राजविद्या राजगुह्ययोग' असे सुंदर नाव धारण करणारा भगवद्गीतेच्या ऐन मध्यावरील हा नववा अध्याय आहे.यात श्रीभगवंतांनी अध्यात्मविद्येला राजविद्या म्हटले आहे,म्हणजेच अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांची सम्राज्ञी आहे . याहीपुढे जाऊन श्रीभगवंतांनी या अध्यायात अध्यात्मविद्येच्या साधकांसाठी काही विलक्षण गूढांची उकल केली आहे . हेच ते राजगुह्य म्हणजे सगळ्यात मोठे गूढ .श्रीभगवंतांचे हे क्रांतदर्शी विवेचन आणि त्यावरील श्रीज्ञानेश्वरांचे निरूपण यामुळे हा अध्याय गूढाच्या प्रवासातील दीपस्तंभासारखा मार्गदर्शक झाला आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांविषयी व्यक्त केलेली आदरभावना नवव्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांबद्दल आत्यंतिक आदराची भावना प्रकट केली आहे. त्यांनी या श्रोत्यांना 'सर्वज्ञांचा समाज' म्हणून गौरविले आहे. अशा उदारधि श्रोत्यांचा आश्रय असेल, तर लळे व मनोरथ पूर्ण होणारच, कारण हे श्रोते त्यांना श्रीमंत माहेरासारखे कृपाशील व वत्सल वाटतात. कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती । जरी ...