प्रभात –गान (Aubade: : Philip Larkin यांच्या इंग्लिश कवितेची पद्यानुकृती)
प्रभात –गान ( Aubade : : Philip Larkin यांच्या इंग्लिश कवितेची पद्यानुकृती) दिवसभराचं काम. रात्री जराशी नशा करतो पहाटेचे चार. शांत अंधारात मी टक लावतो. पडद्यांच्या कडा आता उजळत जातील हळूहळू नेहमी वाट पाहणारं सत्य मला यावेळी येतं कळू अविश्रांत मृत्यू अजून एका दिवसाने जवळ आलाय कधी आणि कसा मी मरणार? दुसरातिसरा सुचत नाही विचार . ओसाडओसाड प्रश्न. मरणाचे मरण्याचे भयाकार तळपतात पुन्हा,दिपवतात,घाबरवतात धुवांधार. मन कोरं होतं स्वच्छ त्या तेजात -न पश्चात्ताप, -राहून गेलेलं भलं करणं,प्रेम करणं, आणि मग वेळ असातसा दवडणं- न दु:खदाहही या सर्वाचा कारण हे आयुष्य एकुलतं चुकीच्या ठिकाणाहून निघतं, धडपडतं, कष्टाने चढतं. कदाचित कधीच नाही यातून सावरणार ते असंच समग्र निरंतर शून्यतेमध्ये विरणार ते आपण प्रवास करत पोचतो याच निर्मूलतेकडे हरवतो. शिल्लक ना राहतो इकडे, ना तिकडे . लवकरच.याहून काय आहे खरं ? याहून काय अधिक भयंकर...