प्रवास – ( The Journey, by Tamara )
प्रवास – ( The Journey, by Tamara, born 1960, in Israel. A poet, painter, healer and a teacher. ) मी शपथ वाहते वाहत जाण्याची घेऊन जाऊ देत ते परमतत्त्व मला स्व-च्या सीमेपार. घसरत घरंगळत भराभर निसरड्या उतारांपल्याड मी जाते काळोख्या गुहांच्या आत आत मी खिळून जाते आणि सोनेरी वितळत्या विजेत मुक्त नृत्य करते माझ्या शरीराची काहिली उष्णतेत होत असतानाच. शरीर , माझं शरीर , अचानक तोल सुटलेलं , भयाने गोठलेलं बिचारं. त्याला वाटतं आपण मरणार आता. प्रत्येक पेशी गुणगुणतेय विद्युत्भारित गीत एका भव्य पतंग-कीटकाचं. जळत आत आत माझा चेहरा वितळतोय , वितळतोय वाऱ्यात . धृवप्रदेशीय वारा विझवतो ती आग तरीही जळतोय आतून. पृथ्वी हादरतेय समूळ. मी थरथरते , शहारते , थरकापते , तरंगत राहते. गुरफटते .ढाळली जाते अद्भुत फुलांमध्ये . एक प्रचंड अश्मयुगीन रंगवलेला टोळ , प्रार्थना करणारा , स्तब्ध न्याहाळतो मला. मायाविश्वातील शक्तिशाली वाघ झेपावतोय . माझ्या संज्ञा घट्ट बिलगतात पहाडी घारीच्या पंखांना. धृवप्रदेशीय वारा विझवतोय आग पण ...