प्रवास – ( The Journey, by Tamara )





प्रवास – ( The Journey, by Tamara, born 1960, in Israel. A poet, painter, healer and a teacher. )




मी शपथ वाहते वाहत जाण्याची

घेऊन जाऊ देत ते परमतत्त्व मला

स्व-च्या सीमेपार.

घसरत घरंगळत भराभर

निसरड्या उतारांपल्याड

मी जाते काळोख्या गुहांच्या आत आत

मी खिळून जाते आणि सोनेरी वितळत्या विजेत मुक्त नृत्य करते

माझ्या शरीराची काहिली उष्णतेत होत असतानाच.

शरीर ,माझं शरीर,

अचानक तोल सुटलेलं ,

भयाने गोठलेलं बिचारं.

त्याला वाटतं आपण मरणार आता.

प्रत्येक पेशी गुणगुणतेय

विद्युत्भारित गीत एका भव्य पतंग-कीटकाचं.

जळत आत आत माझा चेहरा वितळतोय , वितळतोय वाऱ्यात .

धृवप्रदेशीय वारा विझवतो ती आग तरीही जळतोय आतून.

पृथ्वी हादरतेय समूळ.

मी थरथरते , शहारते, थरकापते ,

तरंगत राहते. गुरफटते .ढाळली जाते अद्भुत फुलांमध्ये .

एक प्रचंड अश्मयुगीन रंगवलेला टोळ , प्रार्थना करणारा ,

स्तब्ध न्याहाळतो मला. मायाविश्वातील शक्तिशाली वाघ झेपावतोय .

माझ्या संज्ञा घट्ट बिलगतात पहाडी घारीच्या पंखांना.

धृवप्रदेशीय वारा विझवतोय आग

पण मी अजून धुमसतेच आहे आतून.

आग आणि बर्फ. आग आणि बर्फ.

कुठे आहे स्वर्गाचा रस्ता ?

मी आहे पृथ्वी . मीच आहे आकाश.

मी आहे जवळून वाहात जाणारे वृक्ष.

त्या एकाच्या परमजाणिवेत

मी आहे सर्वकाही.

आणि मी कुणी नाही.




गातंय वर्तुळ . गोलगोल फिरतंय .

मला नाव नाही. हजार नावं आहेत.

माझ्या मस्तकात बोलत राहतात असंख्य आवाज,

कुजबुजतात , किंचाळतात.

प्रत्येकाचं आपापलं सत्य सांगत राहतात.

आणि सगळीच सत्यं असतात आत्मनिर्भर, परिपूर्ण.

मानुषी हृदयांचं एकत्व ,जशा खोल किणकिणत्या नाजूक घंटा जीवनाच्या.

झाडं झुळुकतात ,पाषाण

प्रतिध्वनित करतात , आकाश

उंच जातं सूर जुळवत, सूर जुळवून.

आत्म्याला स्वस्थानी नेतं ते गाणं .

मी हालचाल करते न हालताच

ताऱ्यांच्या तालावर नृत्य करते .

माझ्या आंतरविश्वाला लपेटतो

एक प्रकाश द्रवरूप अग्नीचा,जितंजागतं प्रेम,

रंगीबेरंगी विजा कोसळत असताना गाणं बिचकत नाही की थांबत नाही.

स्फोट होतात सगळ्याच ध्वनींचे एकाचवेळी.

मी आहे सर्व काही.

आणि मी कुणी नाही.




मी पाहते सर्वच कोनांतून ,

मी पाहते प्रत्येक पेशी, तारका,

अखिल मानवजातीची वेदना मी वाहते.

प्रत्येक जखमेच्या डागाखाली पोळून निघते.

हृदयांमधून झुळझुळणारा आनंद श्वासात भरून घेते,

जो उघडतो अंधाराची आणि प्रकाशाची विश्वं .

सर्व काही स्वीकारतो,

नाकारत नाही काहीच.

सकाळ होण्याआधी अंधार जमून आला पाहिजे.

अंधारातून प्रवास केला पाहिजे सूर्याच्या

पुनरुत्थानाआधी.

सगळी मानवी हृदयं एक ताल धरतात.

गिटार झंकारतं , तालवाद्ये घुमतात.

वर्तुळाच्या तारा विस्तारतात

पृथ्वी आणि आकाश जोडत .

चंदेरी धुकं चमकतं .

प्रत्येक श्वासागणिक भरारी घेतो आम्ही ,

ऐकत ती साद, प्रत्येकासाठी आणि सर्वांसाठी .

संवेदनांमध्ये भरून राहो हा आनंद .

प्रेम. ते आहोत आपणच. जितंजागतं ,वर आणि खाली.

सगळे आवाज एका सुरात गातात .

मी आहे सर्वकाही .

आणि मी कुणी नाही.




(तमारा यांच्या मूळ रचनेचा अनुवाद : भारती बिर्जे डिग्गीकर, आपले छंद २०१६ दिवाळी अंकात प्रकाशित )




The Journey-by Tammara




I swore to let go, let

the Great Spirit take me beyond

the boundaries of self. Slipping fast,

slipping past the slippery slope

into the dark cavern inside I go, paralyzed, dancing freely

in the molten golden lightening that scorches

my body, suddenly freaks out, my body,

my scared-out-of-its-wits body

is sure we are going to die every cell humming

the electric song of the giant wasp, burning, burning

from within, my face melting, melting

in the wind, arctic wind puts out the fire but still burning

from within. The foundations of earth quake,

I quiver, I shudder, I shiver, I hover,

entangled and wrought in unearthly flowers,

a painted praying mantis watches over me,

a Mayan tiger leaps, my senses clutching the condor's wing

arctic wind puts out the fire but I'm still burning

from within.

Fire and Ice, Fire and Ice

show me the way to paradise.

I AM the earth, I AM the sky,

I AM the trees floating by,

in the consciousness of the One,

I am all and I am none.




The circle is singing, the circle goes round,

I have no name - I have a thousand,

multitude of voices inside my head, speaking,

mumbling, shouting, each speaking its own truth,

and all truths are self evident and complete.

The Unity of human hearts

sounds the deep chime of life:

the trees breeze it, the rocks echo it, the sky soar high,

attuning, tuned, singing the soul home.




I move without moving, I dance to the rhythm of the stars,

the light within envelopes my universe

with liquid fire, Living Love,

colored lightning strikes but the singing never falters, never stops,

all sounds explode at once, I AM all and I AM none.

I look from all perspectives, I see each cell, each star,

I feel the pain of human collective, I sear with every scar,

I feel the joy that springs from hearts

opening to darkness and to light,

accepting all, rejecting none,

darkness must materialize

before the morning comes,

darkness must be journeyed through before the resurrection

of the sun. With human hearts all beating as one

the streaming guitar and the echo of drums,

the circle is wired to earth and to sky,

silver fog glows, with each breath we fly,

we hear the call for one and for all,

FEEL the joy, BE the love, the living love below and above,

all voices sing as one, I AM all and I AM none.


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग