प्रकाश - Of Light : Agha Shahid Ali- एक पद्यानुवाद


प्रकाश - Of Light : Agha Shahid Ali- एक पद्यानुकृती


जातेस तू पहाटे जेव्हा नदी नहाते,उजळून आसमंती देहातला प्रकाश
प्रेमात हारलेला गवसे मला तिथेच तो मूळ शुद्धरूपी उगमातला प्रकाश


"माझ्या न येत कामी जेव्हा निरोपभाषा,मी टाकते गिळून ओठांवरील शब्द"
ती हात हालवीते, मार्गस्थ दु:खवेगे मग होत पालखीच्या कोशातला प्रकाश

जाळाल ग्रंथ माझा?पण राख पाठवाच !सांगेन मी जगाला इतकेच शेवटी की
त्यांनी मला दिलेला माझ्या फिनिक्सचा हा मरणास मात देवो सरणातला प्रकाश

इतिहास वाचताना शिकतात आसवे जे,तात्पर्य वाकुडेसे ते एवढेच होते-
की चेहरा मनस्वी करतो विदीर्ण येथे सर्वस्व मागणारा रक्तातला प्रकाश

क्षणमात्र अंतरात आला विचार एक,गेला विरून कोठे कळले मलाच नाही
प्रॉमेथियस कशाला भोगेल पापदाह आणावयास येथे स्वर्गातला प्रकाश

इतकेच ती म्हणाली,'नावामधून माझ्या हिमरेष गोठलेली उतरून येत
असते'
-मी काय सांडली ती कोठेतरी जिथे तो होता किनारलेला काठातला प्रकाश?

एकांत साधुनी मी फिरतो असाच दूर जणु शोधतो स्वत:शी परमेशचाहुलींना
केव्हाच ना परंतू मी शक्त जिंकण्याला -आहे निगूढ पूर्ण तो आतला प्रकाश

खेळात कल्पनेच्या सरल्या समग्र कांक्षा उरलीच ना उमेद नि:सत्व वास्तवात
अल्लाउदीन आता पुरताच अंध झाला घेऊन जीन गेला त्याच्यातला प्रकाश

रत्ने झळाळ ल्याली भासे वधूप्रमाणे ही काय मॅनहॅटन लाजेल एक दिवशी
भानात आणताना ब्रूक्लीन साजणाला जेव्हा पुरा पडेना दिवसातला प्रकाश?

ही गाल-अस्थि आहे,ही वक्र एक भिवई,ही पापणी फिकूट,हा शीण डोळियाचा
हे सर्व एवढेच -आहे मला कळाले - आतील यंत्र झरतो ज्याच्यातला प्रकाश

अज्ञात मित्रवर्या ! जेथे नदी वळेल अत्यंत रिक्त क्षेत्री शून्यात शेवटाला
माझ्या तमात सोड,बुडवून टाक तेथे सारा पसारलेला विश्वातला प्रकाश..


-भारती बिर्जे डिग्गीकर
· * *
At dawn you leave. The river wears its skin of light.
And I traced love’s loss to the origin of light.
“I swallow down the goodbyes I won’t get to use.”
At grief’s speed she waves from a palanquin of light.
My book’s been burned? Send me the ashes, so I can say:
I’ve been sent the phoenix in a coffin of light.
From History tears learn a slanted understanding
of the human face torn by blood’s bulletin of light.
It was a temporal thought. Well, it has vanished.
Will Promethus commit the mortal sin of light?
She said, “My name is icicles coming down from it…”
Did I leave it, somewhere, in a margin of light?
When I go off alone, as if listening for God,
there’s absolutely nothing I can win of light.
Now everything’s left to the imagination -
a djinn has deprived even Aladdin of light.
We’ll see Manhattan, a bride in diamonds, one day
abashed to remind her sweet man, Brooklyn, of light.
“A cheekbone, / A curved piece of brow, / A pale eyelid…”
And the dark eye I make out with all within of light.
Stranger, when the river leans toward the emptiness,
abandon, for my darkness, the thick and thin of light.
: Agha Shahid Ali
Kashmiri-American poet

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग