यंत्र-विजय : एक पद्यानुवाद
यंत्र-विजय : एक पद्यानुवाद
(The Triumph of the Machine-: DH Lawrence)
यंत्राच्या विजयाबद्दल ,जो कधी होणार
नाही,ते खूप बोलत असतात ..
सहस्त्र मानवी शतकं झरतात काळाच्या
ओंजळीतून,झुडपं उलगडतात
पांढऱ्या पाकळ्यांच्या लपलपत्या जिभांनी
रानफुलं सूर्यकिरण चोखतात
मग उजाडतं दु:खाचं एक शतक: सर्व उजाड होतं
,यंत्रं विजयी होतात..
यंत्रं ढकलतात आपल्याला, लोटतात
इकडेतिकडे, फैलावत ओसाडी
बगळ्यांची घरटी गदगदा हलवतात आतली फुटून
जाईपर्यंत अंडी
दलदली घुसळून काढतात ,भेदरलेल्या बदकांची
फडफड पडते उघडी
रानटी हंस निर्वाणीचं गाणं गात आपल्याला सोडून
जातात पैलथडी
कठीण दुस्तर आहेत हे भूस्तर,यंत्रं धडधड
करत येतात ज्यांच्यावरून
तरीपण काहीकाही हृदयांमध्ये नाही राहता
येत त्यांना टिकाव धरून .
त्या कुणाचं ते हृदय,ज्याच्या खळगीत
राहतात बुलबुल घरटी करून
शुभ्र हंसांचे थवे पोहत निघतात मांडीच्या
नसांतल्या लाल चिखलातून
एक तगडा बैल गायींसह फिरतो त्याच्या वक्षाच्या
गवताळ विस्तारावर
निरागस कोकरं मेंदूतल्या रंगफुलांमध्ये स्वच्छंद
बागडतात प्रहर-प्रहर
नाही मरत हे प्राणी, आत्म्याच्या कोपऱ्यात
त्याना ढकलून चेंगरले तर
निर्वाणीचा आक्रोश करतील ,अवकाशभर
त्यांच्या प्राणांतीचे आकांतस्वर
निराश बुलबुल सणाणत उडत आकाशातून तीक्ष्ण
स्वरांचे तीर वर्षवेल
श्वेत क्रोधाने धगधगणारा हंस पंख पुन्हापुन्हा
आपटून पाणी पेटवेल
भोळी कोकरं..तीही ताणून माना सापासारख्या विखाराने
त्याला पाहतील
थरथरते शुभ्र चिनार त्याच्यावर काचेसारख्या
ठिणग्याठिकऱ्या उडवतील
जेव्हा करतील असा उठाव त्याच्या आतूनच
आत्म्याचे हे आदिम रहिवासी
तेव्हा पुरता वेडा होईल अंध होऊन जाईल तो यंत्रारूढ
मानव विजयोल्हासी
कारण कुठलेच यंत्र नसते पोचत आत खोलवर
दुर्गम त्याच्या आत्म्यापाशी
सुटून त्याचा ताबा वळतील आदळतील यंत्रे एकमेकांवर
शेवटच्या दुर्धर दिवशी
असे मोडून पडलेले यंत्र –ढिगारे अन रहदारीची
वाहती गुंतवळ चौबाजूने
मग मोर्चा वळवून राहत्या घरांवरतीच धडका देत
येणारी गतिमान इंजिने
ताळ सुटलेल्या यंत्रांचे ते वेडेच आवेग झेलताना
खचत जाते समग्र जगणे
पायातूनच घरे ढासळत जातील भ्रामकच होते तर
त्यांचे भरभक्कम दिसणे
मग या उद्ध्वस्तीपासून खूप दूर, दूरवर आहे एक अंतिम स्थानक
जिथे हळूच पुन्हा उचलून पाहेल एक हंस
ठेचून गेलेले दुखरे मस्तक
अवतीभोवती अंदाज घेत पाहात उठेल बळकट
पंखांची उभारी जोखत
चंदेरी रेशमी भरारी कोरेल नव्या दिवसावर सूर्याला
अभिवादन करत
बुलबुल वर्षवेल पुन्हा तीक्ष्ण स्वर ,पण
क्रोधरहित ,आणि ती कोकरे
रंगफुलांना चघळत तीही कुरणात बागडू लागतील
कानांत भरून वारे
पृथ्वीच्या मध्यावर त्याच वेळी दूर उठत
असेल लोह-ढिगाऱ्यातून धूर
मोडलेल्या विजयी यंत्रांच्या ढिगाचा जिथे साठून
राहिला असेल चकणाचूर ...
अनुवाद- भारती..
They talk of the triumph of the
machine,
but the machine will never
triumph.
Out of the thousands and
thousands of centuries of man
the unrolling of ferns, white
tongues of the acanthus lapping at the sun,
for one sad century
machines have triumphed, rolled
us hither and thither,
shaking the lark's nest till the
eggs have broken.
Shaken the marshes, till the
geese have gone
and the wild swans flown away
singing the swan-song at us.
Hard, hard on the earth the
machines are rolling,
but through some hearts they will
never roll.
The lark nests in his heart
and the white swan swims in the
marshes of his loins,
and through the wide prairies of
his breast a young bull herds his cows,
lambs frisk among the daisies of
his brain.
And at last
all these creatures that cannot
die, driven back
into the uttermost corners of the
soul,
will send up the wild cry of
despair.
The thrilling lark in a wild
despair will trill down arrows from the sky,
the swan will beat the waters in
rage, white rage of an enraged swan,
even the lambs will stretch forth
their necks like serpents,
like snakes of hate, against the
man in the machine:
even the shaking white poplar
will dazzle like splinters of glass against him.
And against this inward revolt of
the native creatures of the soul
mechanical man, in triumph seated
upon the seat of his machine
will be powerless, for no engine
can reach into the marshes and depths of a man.
So mechanical man in triumph
seated upon the seat of his machine
will be driven mad from within
himself, and sightless, and on that day
the machines will turn to run
into one another
traffic will tangle up in a
long-drawn-out crash of collision
and engines will rush at the
solid houses, the edifice of our life
will rock in the shock of the mad
machine, and the house will come down.
Then, far beyond the ruin, in the
far, in the ultimate, remote places
the swan will lift up again his
flattened, smitten head
and look round, and rise, and on
the great vaults of his wings
will sweep round and up to greet
the sun with a silky glitter of a new day
and the lark will follow
trilling, angerless again,
and the lambs will bite off the
heads of the daisies for very friskiness.
But over the middle of the earth
will be the smoky ruin of iron
the triumph of the machine.
Comments
Post a Comment