पिकासोचं स्वप्न-फ्रान्सिन स्टर्ले -Dreaming of Picasso-एक अनुकृती
फ्रान्सिन स्टर्ले - मिनेसोटा , अमेरिका, जन्म १९५२ ,लेखिका , कव यित्री , शिक्षिका , मार्गदर्शक ; कविता आणि लेखनविषयक वर्कशॉप्सचं आयोजन. यांची Dreaming of Picasso ही चित्रप्रत्ययदर्शी कविता, एक वेगळ्या प्रकारे चित्रशैलीकविता असंही म्हणता येईल. अतिशय जिव्ह्याळ्याचा हा विषय,त्याला दिलेला स्त्रीवादाचा प्रभावी स्पर्श. मी केलेली ही अनु कृती. पिकासोचं स्वप्न- रात्रभर भरभरून कहर शेकडो भौमितिक डोळ्यांचा माझ्या स्वप्नसृष्टीवर रात्रभर रात्ररात्रभर. पाखरं आणि होड्या किडे ठिपके फुल्या की डोळ्यांच्या या जोड्या हिऱ्यांच्या विसंगत कुड्या शून्यांचा गोलवा लपकाभर चांदवा चेहऱ्यावर ओघळावा गालांमधून निखळावा उभा न आडवा कानांखाली लोंबत कपाळाशी झोंबत कागदबाण रोरावत प्रत्येकच डोळा जिवंत आणि टकरावत सांध्यातून उघडे बायकांचे मुखडे त्यांचेच हे तुकडे आई बायको प्रेयसी किती शांत पण वाकडे ठिक-यांच्या ढिगाऱ्यात कळवळते सस्ती यांची उद्ध्वस्ती डोक्याच्या गच्चीत मांडलेली वस्ती निजेतला कहर मग माझीच नजर जोडीचे डोळे शोधते भरभर एवढ्या गर्दीतून झटपट लवकर तर अशी धावेन शोधून शोधून ...