पिकासोचं स्वप्न-फ्रान्सिन स्टर्ले -Dreaming of Picasso-एक अनुकृती

 

फ्रान्सिन स्टर्ले - मिनेसोटा , अमेरिका,जन्म १९५२ ,लेखिका,
 कवयित्री ,शिक्षिका ,मार्गदर्शक; 
कविता आणि लेखनविषयक वर्कशॉप्सचं आयोजन. 
यांची Dreaming of Picasso ही चित्रप्रत्ययदर्शी कविता, 
एक वेगळ्या प्रकारे चित्रशैलीकविता असंही म्हणता येईल.
अतिशय जिव्ह्याळ्याचा हा विषय,त्याला दिलेला स्त्रीवादाचा
 प्रभावी स्पर्श. मी केलेली ही अनुकृती.
 

पिकासोचं स्वप्न-

 

रात्रभर भरभरून कहर शेकडो भौमितिक डोळ्यांचा माझ्या स्वप्नसृष्टीवर रात्रभर रात्ररात्रभर.

पाखरं आणि होड्या किडे ठिपके फुल्या की डोळ्यांच्या या जोड्या हिऱ्यांच्या विसंगत कुड्या

शून्यांचा गोलवा लपकाभर चांदवा चेहऱ्यावर ओघळावा गालांमधून निखळावा उभा न आडवा

कानांखाली लोंबत कपाळाशी झोंबत कागदबाण रोरावत प्रत्येकच डोळा जिवंत आणि टकरावत

सांध्यातून उघडे बायकांचे मुखडे त्यांचेच हे तुकडे आई बायको प्रेयसी किती शांत पण वाकडे

ठिक-यांच्या ढिगाऱ्यात कळवळते सस्ती यांची उद्ध्वस्ती डोक्याच्या गच्चीत मांडलेली वस्ती

निजेतला कहर मग माझीच नजर जोडीचे डोळे शोधते भरभर एवढ्या गर्दीतून झटपट लवकर

तर अशी धावेन शोधून शोधून जोड्या अशा लावेन स्वत:च्या डोळ्यासाठी आरसा जर उचलेन

तर चकितलेल्या मला त्यात विस्कटलेला दिसेल माझा डोळा लोखंडी गालावर तरंगून आलेला.. 


-    भारती..

 

Dreaming of Picasso- Francine Sterle 

 

 

All night an accelerating

geometry of eyes—hundreds

 

shaped like birds or boats

or beetles, simplified to dots

or crosses or a pair of 2s or mis-

matched diamonds, perfect zeros,

scoops of moon placed sidewise

or lengthwise on a face, slipping

out of orbit on a cheek, hung

under an ear, planted mid-forehead,

paper-thin planes of them,

each one alive and staring

from the dislocated faces of wives,

lovers, mothers, serene and lopsided,

splintered, wrenching, ravaged,

a proliferating gallery of women,

terraced in my head as I sleep,

and my own curious eye:

steering toward what it perceives,

capturing exact duplicates of each

stylized eye I run by,

as I race to comprehend

what I'm taking in, what expression

I'd see if I raised the mirror

to find my own eye, distorted

and floating above an iron cheek.

 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग