Posts

Showing posts from May, 2024

सहप्रवास १

सहप्रवास १   (कॉलेजचा एक छोटासा हॉल-वातावरणात अर्थातच यौवन,अदम्य उत्साह आणि जरा जास्तच मात्रेतला आत्मविश्वास-खुर्च्यांची आता कोंडाळी झालीयेत-अंतराअंतरावर चर्चा,गप्पांचे अड्डे-एक छोटंसं स्नेहसंमेलन आत्ताच संपल्याचे संकेत.)   मीनू- एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही उमा.तुला आठवतं,इथे शेवटी भेटलो होतो तेव्हा तूच म्हणाली होतीस्,पुनः फिरून इथं यायचं नाही खूप काळ.वर्षानुवर्षं.   उमा-हो आठवतं ना.आणि त्याच्यामागे कुठेतरी पु.शि.रेगेंची सावित्री होती मीनू.तिनेच म्हटलं होतं ना की काही घटना सारख्या मनात हाताळायच्या नसतात.त्यांचे रंग फिके होतात त्यामुळे!तशाच ठेवून द्यायच्या आठवणीसुद्धा.अस्पर्श.खूप वर्षे पुरवायच्या आहेत ना त्या ..   मीनू- हेच ते तुझं.साध्या बोलण्यालाही उगीच कसलेतरी कठीण तात्विक साहित्यिक संदर्भ.तरी बरं मला तरी अपवादात ठेवलं आहेस.महिन्या-दोन महिन्यातून भेटतो आपण.इथे नाही,पण कुठेतरी.कुठेही.   प्रीता-(पलिकडच्या कोंडाळ्यातून हे ऐकत एकदम वळून या दोघींमध्ये घुसते)- कुठे भेटता ग तुम्ही यूसलेस मुलींनो! मुद्दाम मला न सांगता गुपचूप-आता तरी जरा वयात या ग तुम्ही-हे तुमचं सारखं आपसात असणं किती विनोदी