स्वागतगीत – Song of Welcome-जोसेफ ब्रॉडस्की -रशिया
जोसेफ ब्रॉडस्की (Joseph Brodsky) रशिया नोबेल १९८७
स्वागतगीत – Song of Welcome
ही तुझी आई आणि तुझे बाबा सोबत
त्यांच्या रक्तमांसाचा तू म्हणून तुझं स्वागत !
का तुझ्या चेहऱ्याची पण उडालीय रंगत ?
हे आहे तुझं जेवण आणि हे पेय नंतर
करायचाच तर थोडासा विचारही कर
स्वागत, हे सगळं आहे तुझंच
तर !
ही घे तुझी पाटी .. आहे बरीचशी कोरी
स्वागत तुझं , थोडासा उशीर झालाय
जरी
स्वागत, असू दे रे, आपलं कसलंतरी .
हा तुझा पगाराचा चेक, आणि हे घरभाडे
पांचवं मूलतत्त्व पैसा ! आहे का हे थोडे ?
पैपैशासाठी तुझे स्वागत लाडेलाडे ..
हा तुझा थवा आणि हे मोठ्ठे मध-पोळे
स्वागत !पन्नासेक लाखांचे आहेत इथे गाळे
एकमेकांसारखे तुम्ही,कुणी ना निराळे.
स्वागत ! फोनबुकात तुझ्या नावापुढे चांदणी
लक्ष्य लोकशाहीचे या आकड्यांची छुपी रेखणी
स्वागत ! कीर्तीची ही खूण तुला वाटे देखणी .
हे तुझं लग्न, आणि हा तुझा काडीमोड
क्रम बदलणे अशक्यच ते,जाऊ दे रे सोड !
स्वागत तुझे !तुलाच ना हे वाटत होते गोड ..
हे घे तुझं ब्लेड आणि हे आहे तुझं मनगट
स्वागत! तूच वठव तुझा दहशतवादी दांडगट
हेच तुझं रक्तरंजित आखातातलं वाळवंट ..
हा तुझा आरसा, चमक तुझ्या
दातांवरती
हा ऑक्टोपस तुझ्या स्वप्नात झाला भरती
किंचाळण्याला कष्ट तुला का बरे पडती ?
हे घे मक्याचं कणीस, हा तुझा टीव्ही असे
मागे पडून त्रासलेला तुझा उमेदवार दिसे
स्वागत.. ऐकून घेण्यासाठी त्याचे कसेबसे
तुझ्या व्हरांड्यातून बघ ही रहदारी गाड्यांची
तुझा कुत्रा घाण करतोय चोरटी नजर त्याची
स्वागत! घे मजा त्याच्या साळसूदपणाची.
तुझे चतुर, तुझ्या काळ्या मैना
त्यांच्यासंगे
कंदाचा कोरडा थेंब तुझ्या लेमन चहात तरंगे
स्वागत तुझे रंगताना अनंताच्या रंगे
तुझ्या गोळ्या ठेवलेल्या या प्लास्टिकच्या बशीत
निराश करणारा एक्सरे-रिपोर्ट कोराकुरकुरीत
स्वागत तुझं! स्वस्थ राहा तू प्रार्थना करीत
हे आलं तुझं दफनस्थळ.. एक शांत नीटस घळी
स्वागत ‘’तथास्तु’’ म्हणणाऱ्याचं असल्या स्थळी
म्हातारबुवा ,सरलीच की जगण्याची
गंगाजळी.
हे तुझं मृत्यूपत्र आणि त्याचे हे लाभार्थी काही
एक रिकामं बाकडं तेवढं नंतर इथे पडून राही
तुझ्यानंतर आयुष्याची वर्दळ थांबत नाही..
हे तुझे तारे- आताही पूर्वीसारखेच चमचमते
असे चमकतात जसे तुझे इथे काहीच नव्हते
त्यांची विचारसरणी वेड्या काय तुला कळते ?
तुझं मृत्यूनंतरचं अस्तित्व .तुझाच पत्ता नाही
तुझ्या चेहऱ्याचा तर नाही मागमूस जरासाही
स्वागत !‘अवकाश’ असं म्हण आता याला तूही
स्वागत, जिथे कुणीही घेऊ शकत
नाही श्वास
भूगर्भासारखेच वाटत आहे हे असले आकाश
शनी त्याच्या कड्यांचे वाहे पुष्पचक्र उदास..
(आपले छंद दिवाळी
२०१८ मधून )
भारती बिर्जे-डिग्गीकर
Here’s your mom,
here’s your dad.
Welcome to being
their flesh and blood.
Why do you look so
sad?
Here’s your food,
here’s your drink.
Also some thoughts,
if you care to think.
Welcome to
everything.
Here’s your
practically clean slate.
Welcome to it,
though it’s kind of late.
Welcome at any
rate.
Here’s your
paycheck, here is your rent.
Money is nature’s
fifth element.
Welcome to every cent.
Here’s your swarm
and your huge beehive.
Welcome to the
place with its roughly five
billion like you
alive.
Welcome to the
phone book that stars your name.
Digits are
democracy’s secret aim.
Welcome to your
claim to fame. ____
Here’s your marriage,
and here’s divorce.
Now that’s the
order you can’t reverse.
Welcome to it; up
yours,
Here’s your blade,
here’s your wrist.
Welcome to playing
your own terrorist;
call it your Middle
East.
Here’s your mirror,
your dental gleam.
Here’s an octopus
in your dream.
Why do you try to
scream?
____
Here’s your
corncob, your TV set.
Your candidate
suffering an upset.
Welcome to what he
said.
Here’s your porch,
see the cars pass by.
Here’s your
shitting dog’s guilty eye.
Welcome to its
alibi.
Here are your
cicadas, then a chickadee,
the bulb’s dry tear
in your lemon tea.
Welcome to
infinity.
____
Here are your pills
on the plastic tray,
your disappointing,
crisp X-ray.
You are welcome to
pray.
Here’s your
cemetery, a well-kept glen.
Welcome to a voice
that says “Amen.”
The end of the
rope, old man.
Here’s your will,
and here’s a few
takers. Here’s an
empty pew.
Here’s life after
you.
And here are your
stars which appear still keen
on shining as
though you had never been.
They might have a point,
old bean.
Here’s your
afterlife, with no trace
of you, especially
of your face.
Welcome, and call
it space.
Welcome to where
one cannot breathe.
This way, space
resembles what’s underneath,
and Saturn holds
the wreath.
Comments
Post a Comment