Posts

Showing posts from 2024

सहप्रवास ६

  सहप्रवास ६ (गावातल्या वाड्यातल्या बैठकीच्या खोलीचा दर्शनी भाग. दोन मोठ्या खिडक्या.मध्ये विवेकानंदांचा एक फोटो. एका कोपर्‍यात एक अलमारी.शेजारी एक स्वच्छ बैठक आणि बैठं मेज. दोन खुर्च्या,एक आरामखुर्ची. या आरामखुर्चीत उमा बसलीय.डावा हात प्लॅस्टरमध्ये चक्क गळ्यात बांधलेला. दादा नाईक येरझारा घालताहेत..उमाचे वडील.उंच, गोरे,गंभीर,भारदस्त व्यक्तिमत्व.)  दादा- उमा कसं आहे हाताचं आता? काल रात्रीसुद्धा चुळबुळत होतीस अंथरुणात. कितीदा येऊन बघून गेलो. आधीच रात्री नीट झोपतही नव्हतीस महिनाभर, आता जरा घडी बसतेय त्यात हा अपघात करून घेतलास.  उमा-( बरीच क्षीण झाली आहे.चेहर्‍यावर व्यग्रतेच्या सावल्या.) हळुहळू शरीराचे ,मनाचे घाव भरत जातातच बाबा,निसर्गच आहे तो,पण झालंय असं की या खूप रिकामपणात स्वतःकडे बघायलाच घाबरलेय मी. आत्ताच पुरेपुरे वाटायला लागलंय आयुष्य.स्वतःला कोणत्या प्रयोजनाचं खेळणं देऊ मी बाबा?  दादा- वेडी आहेस का उमा? बघ, असं असतं की एक उभारलेली मोहनगरी असते मनात.माणसं वर्षानुवर्षं रमून असतात म्हण किंवा अडकून असतात.असे प्रश्न विचारायची सवयच नसते त्यांना.  उमा- मी तरी काय मागून घेतली ही सवय ?सारखे

सहप्रवास ५

  सहप्रवास ५ (मीनूची ऑफिस केबिन.एका खाजगी बॅंकेत ती पदाधिकारी आहे. मीनू एकाग्रपणे काम करतेय.काही उघड्या मिटलेल्या फाईल्स समोर. बॅंकेच्या मुख्यालयाचा मोठा फोटो मागे लावलेला. शिपाई आत येतो.)  शिपाई- मॅडम,तुम्हाला भेटायला दोघेजण आलेत.मेघःश्याम धुरंधर आणि प्रकाश पाटील अशी नावं सांगितलीत.  मीनू- पाठवून द्या त्यांना आत..आणि ऑपरेटरला माझे सर्व फोनकॉल्स दहा मिनटं बंद करायला सांग.मी मीटिंगमध्ये आहे म्हणून. शिपाई- सांगतो मॅडम. (जातो. मेघःश्याम ,प्रकाश प्रवेशतात.)  प्रकाश- हाय मॅडमजी ! विचार करतोय शोभा कोणाची कोणामुळे वाढलीय..तुमची केबिनमुळे की.. (गंभीर होत ) पण आज अजिबात भंकस करायची नाही असं ठरवून आलोय मी.. मीनू- बसा रे ..मेघ, प्रकाश, be comfortable . खूप बोलायचंय आपल्याला.उमाबद्दल. हेच ना? पण सगळ्यात आधी तुझं अभिनंदन प्रकाश! C.B.I. मध्ये थेट ऑफिसरच्या पोस्टवर लागलास!गटांगळ्या खाताखाता पैलतीर गाठलंस की रे राजा. कसं जमवलंस?  मेघःश्याम- त्याला underestimate का करतेयस मीनू?त्याच्या यशाचं सीक्रेट मला विचार. शाळेत आणि कॉलेजात वर्षानुवर्षे बेंचमध्ये लपवून सगळ्या क्लासिक आणि बाजारू मिळतील त्या रहस्यकथा

सहप्रवास ४

  सहप्रवास ४ (काही दिवस उलटलेत. पुनः तोच उमाच्या घराचा हॉल.संध्याकाळची वेळ.. उमा दरवाजाचं लॉक उघडून आत येतेय.चेहर्‍यावर अस्वस्थ प्रश्नचिन्ह.काहीतरी विपरीत घडतंय..)  उमा- (हाका मारत आत-बाहेर जाते-येते-) आक्का-आक्का ..कुठे आहेस ग तू?अरे काय झालंय इथे? निमकरकाकांनी का बोलावून घेतलंय मला? कुणी आहे की नाही घरात? (पुनः जोरात हाक मारते-) आक्का !  (दरवाजावर जोरात ठकठक.-उमा दार उघडते-निमकरकाका आत येतात.चेहरा अत्यंत गंभीर.)  काका- उमा तू कधी आलीस?बैस आधी. पाणी पी जरासं.  उमा- काका असं का बोलताय तुम्ही? तुम्हीच तर ऑफिसात फोन केलात.आक्काला बरं नाहीय,लगेच ये म्हणालात.कुठेय ती? काहीतरी कमीजास्त तर नाही ना घडलेलं ?  काका- विपरीतच घडलंय उमा.आधी तू शांत रहा बाळा. हे सगळं समजून घ्यावंच लागेल तुला..दुपारीच तुझ्या आक्काला हार्ट अटॅक आला.म्हणजे तेव्हा ते कळलं नाही.घरात एकटीच होती पण जोरात ओरडली म्हणून शेजारच्या पावशेकाकूंनी दरवाजा वाजवला-कसाबसा उघडला आक्कांनी आणि मग खालीच कोसळल्या..मग काकूंनी कोण दिसेल त्या दोघातिघांना बोलावलं.केरकर डॉक्टरांना घरी बोलावलं.डॉक्टरांनी लगेच admit करायला सांगितलं.तू एकटीच घाबर

सहप्रवास ३

  सहप्रवास ३ (ऑफिसच्या इमारती असलेला शहराचा एक भाग..वेळ रात्रीची. निर्मनुष्य ओसरलेल्या रस्त्यावरचा एक बस-स्टॉप.एका हॉटेलचा दर्शनी भाग पलिकडे दिसतोय.तुरळक कुणीतरी एकटंदुकटं झपझप घराकडे निघालेलं.मेघःश्याम आणि उमा दोघेच जण स्टॉपवर.)  उमा- वेळ कसा गेला कळलंच नाही रे.रात्र झाली..सांगून आलेय तरी आक्का वाट पहात असेल.आणि हा कुठला स्टॉप निवडलास ! इथे तर बस सुद्धा येत नाहीय..  मेघःश्याम- म्हणून तर निवडलाय !तुझी प्रूफ्स सगळी वाचली हॉटेलातच पण अजून कुठे निघावंसं वाटतंय..खूप काही बोलायचंय उमा.गोची आहे या शहराची. निवांत बसायला बोलायला जागाच नाहीत. हॉटेलात अजून किती वेळ काढणार.. हा शेवटचा स्टॉप आपला आजचा.म्हणजे अक्षरशः स्टॉपच! यायलाच सहा वाजवलेस.आत्ता साडेआठ तर होताहेत. उमा- ग्रेटच आहेस मेघःश्याम! कमी का वाजलेत? त्यातून हा सगळा ऑफिसेसचा भाग. नऊच्या आत पॅक-ऑफ करायचंच हं. आणि आता काय राहिलं बोलायचं ? तुझा सगळा एपिसोड विंचरून काढला आपण. तुला हवी ती कल्चरल ब्यूटी यावी म्हणून त्यात अभंग पेरले,बोलीभाषेतले चंद्रभागेच्या वाळवंटातले संवादाचे तुकडे घातले-माहितीच्या भागांचं एडिटिंग केलं..आत्मस्तुतीचा दोष पत्करू

सहप्रवास २

  सहप्रवास २ (उमाच्या घराचा हॉल.पण स्वरूप लायब्ररीचं.दोन मोठ्ठी बुकशेल्व्ज एकमेकांशी कोन करून. जवळच एक सरस्वतीचं छोटं संगमरवरी शिल्प.वीणाधारिणी. सेटीजवळ एक लहानसं टीपॉय घेऊन उमा काहीतरी लिहितेय.)  आक्का-(साठीच्या आसपासचं वय.लहान चण. वय होऊनही एक निरागसपणा चेहर्‍यावर-आतून बाहेर येते-) कधीची लिहिते आहेस ग उमा.काय आहे ते?  उमा- अग मेघःश्याम कधीचा मागे लागलाय त्याच्या टेलिव्हिजनच्या कामात मदत हवी म्हणून.मला वेळ कुठे आहे? पण म्हटलं एखादा एपिसोड तरी करून द्यावा..  आक्का-कसला एपिसोड ग ?  उमा-महाराष्ट्रातले टूरिस्ट स्पॉटस करतोय ना तो..मला म्हणाला पंढरपूरसाठी तुझ्याकडून inputs हवेत..आक्का- पंढरपूरमधल्या निरनिराळ्या मठांवर लिहिलेलं वाचून दाखवू? काही अजून येण्यासारखं आहे का बघ ना..खरं तर बाबाच इथे हवे होते.  आक्का- ते ऐकतेच ग.आधी सांग हा मेघःश्याम कोण? वर्षभरापूर्वी ती चारपाच मुलंमुली आली होती त्यातलाच का? काही नीट लक्षात येत नाही..फोनही करतो कधीकधी,आडनाव धुरंधर ना त्याचं?घरी कोणकोण आहेत?  उमा-आक्का कशाला ग इतक्या चौकशा-चांगला मित्र आहे ,सहृदय,चौफेर व्यक्तिमत्वाचा, गर्भश्रीमंत आहे..बर्‍याच मुली अ

सहप्रवास १

सहप्रवास १   (कॉलेजचा एक छोटासा हॉल-वातावरणात अर्थातच यौवन,अदम्य उत्साह आणि जरा जास्तच मात्रेतला आत्मविश्वास-खुर्च्यांची आता कोंडाळी झालीयेत-अंतराअंतरावर चर्चा,गप्पांचे अड्डे-एक छोटंसं स्नेहसंमेलन आत्ताच संपल्याचे संकेत.)   मीनू- एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही उमा.तुला आठवतं,इथे शेवटी भेटलो होतो तेव्हा तूच म्हणाली होतीस्,पुनः फिरून इथं यायचं नाही खूप काळ.वर्षानुवर्षं.   उमा-हो आठवतं ना.आणि त्याच्यामागे कुठेतरी पु.शि.रेगेंची सावित्री होती मीनू.तिनेच म्हटलं होतं ना की काही घटना सारख्या मनात हाताळायच्या नसतात.त्यांचे रंग फिके होतात त्यामुळे!तशाच ठेवून द्यायच्या आठवणीसुद्धा.अस्पर्श.खूप वर्षे पुरवायच्या आहेत ना त्या ..   मीनू- हेच ते तुझं.साध्या बोलण्यालाही उगीच कसलेतरी कठीण तात्विक साहित्यिक संदर्भ.तरी बरं मला तरी अपवादात ठेवलं आहेस.महिन्या-दोन महिन्यातून भेटतो आपण.इथे नाही,पण कुठेतरी.कुठेही.   प्रीता-(पलिकडच्या कोंडाळ्यातून हे ऐकत एकदम वळून या दोघींमध्ये घुसते)- कुठे भेटता ग तुम्ही यूसलेस मुलींनो! मुद्दाम मला न सांगता गुपचूप-आता तरी जरा वयात या ग तुम्ही-हे तुमचं सारखं आपसात असणं किती विनोदी