पोर्ट ऑफ स्पेन शहराच्या बागांमधली रात्र-डेरेक वॉलकॉट



डेरेक अॅल्टन वॉलकॉट (Derek Alton Walcott ) जन्म १९३०, हे सेंट ल्यूशियाचे कवी आहेत. त्यांना १९९२ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार व अन्य अनेक साहित्यजगातील सन्मान मिळाले आहेत.
त्यांची कविता  ‘’Night in the Gardens of Port of Spain ‘’- ‘’ पोर्ट ऑफ स्पेन शहराच्या बागांमधली रात्र’’ रात्रीच्या एका  वेगळ्याच विश्वाचा प्रातिभ वेध घेते .

पोर्ट ऑफ स्पेन शहराच्या बागांमधली रात्र

रात्र, काळोखी उन्हाळ्यातली , सोपे करून घेते तिच्या
गंधांचं गाव; ती अभेद्य कस्तुरीगंध होते एका निग्रोचा,

घामाइतकी खाजगी होते ती , तिचे गल्लीबोळ सोललेल्या
शिंपल्यांच्या वासाची दुर्गंधी येणारे.

रसरसलेल्या कोळशासारखी संत्री ,निखारलेल्या फोडी कलिंगडाच्या
बाजार आणि डफाचे ताल वाढवत नेतात तिची धग

नरकाची आग की वेश्याघर : पार्क स्ट्रीट क्रॉस करत
एक लाट उसळते खलाशांच्या चेहऱ्यांची, विरून जाते.

समुद्राच्या संथ चकाकीबरोबरच क्लबातलं रात्रजीवन
किणकिणत रहातं काजव्यांसारखं रात्रीच्या घनदाट केशपाशात.

मोटारींच्या हेडलाईटसमुळे अंधारते तिची नजर,ऐकू येत नाहीत तिला
टॅक्सीचे हॉर्न्स ,ती उचलते तिचा चेहरा सस्त्या काळ्या पेट्रोलच्या भडक्यामधून

शुभ्र ताऱ्यांच्या  दिशेने ,जे शहरांसारखेच निऑन किरणांचे  झोत टाकतात,
एक उठवळ स्त्री होण्याच्या इच्छेने जळत,तिला व्हावंच लागेल तसं. 

आणि सकाळ होते तेव्हा सोललेल्या छिललेल्या नारळांची
हातगाडी हमाल वळवतो घराच्या दिशेने.


मूळ कविता

Night in the Gardens of Port of Spain

Night, the black summer, simplifies her smells
into a village; she assumes the impenetrable

musk of the negro, grows secret as sweat, 
her alleys odorous with shucked oyster shells, 

coals of gold oranges, braziers of melon.
Commerce and tambourines increase her heat.

Hellfire or the whorehouse: crossing Park Street, 
a surf of sailors’ faces crest, is gone
  
with the sea's phosphoresence; the boites-de-nuit
tinkle like fireflies in her thick hair.

Blinded by headlamps, deaf to taxi klaxons, 
she lifts her face from the cheap, pitch oil flare

toward white stars, like cities, flashing neon, 
burning to be the bitch she must become.

As daylight breaks the coolie turns his tumbril
of hacked, beheaded coconuts towards home. 



Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग