शहराचं शोकगीत : (अनुकृती- मूळ कविता रॉबर्ट पिन्स्की )


रॉबर्ट पिन्स्की हे १९४० मध्ये जन्मलेले अमेरिकेचे महान कवी, समीक्षक, साहित्यिक , अनुवादक.Poet Laureate म्हणूनही अमेरिकेने त्यांना मान्यता दिली. जवळजवळ १९ कवितासंग्रह लिहिणारे पिन्स्की कवितेला मौखिक कला मानतात आणि सामान्य लोकांना तिच्या महाप्रवाहात सामील करून घेण्याचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘’ City Elegies ‘’ – शहराचे शोकगीत - या कवितामालिकेचा पहिला भाग .ज्यात त्यांची महानगरीय संपन्न जाणीव आधुनिक कवितेची व्यामिश्र अनुभूती वाचकाला देते.


शहराचं शोकगीत :

प्रत्येकजण असा भरकटत रहातो इथे पूर्ण दिवसभर
स्वतःचं बंदिस्त शहर घेऊन हेलकावत राहातो शहरभर
मंत्रभारित ओसाड : जणू एक स्थानकच शहरगर्भात
कुठे गेलं माझं ते दार जे उघडतं मागल्या आळीत ?

भिंती दगडमंडित,चढउतरते वीटढिगारे,स्फटिक-कडे
कुठं आहे तो माझा रेखीव रस्ता जाणारा बंदराकडे ?
ती खानावळ ?कुठे लपला कारखाना? ते घर प्रेमाचे
जोडकमानीची छतं ?ते काळोख कातळचौकोनांचे ?

कुठाय ती बाग ? वृक्षात झाकलेलं बाकडं लोखंडी ?
शहारत्या वेली.रहदारीवर झुकते देवदारांची रांग खडी
आता आहे आपल्यामध्ये एक डोंगर, अरण्यातली दरी
दोघांना पाहिलं जिथे शिकाऱ्याने,पाखराने उशीरप्रहरी

प्रेमात व्याकूळ होत कुणीतरी असे लिहिले होते शब्द
दिशाहीन सांजवेळी हृदय पुटपुटत रहातं ते असंबद्ध
सकाळी कामं करत राहातं  हिंसक इच्छांनी जडभारी
कुठाय माझी प्रकाशांची पुष्पमाळ?ती आगगाडी चंदेरी ..

- भारती

- City Elegies

All day all over the city every person
Wanders a different city, sealed intact
And haunted as the abandoned subway stations
Under the city. Where is my alley doorway?
-
Stone gable, brick escarpment, cliffs of crystal.
Where is my terraced street above the harbor,
Café and hidden workshop, house of love?
Webbed vault, tiled blackness. Where is my park, the path
Through conifers, my iron bench, a shiver
Of ivy and margin birch above the traffic?
A voice. There is a mountain and a wood
Between us—one wrote, lovesick—Where the late
Hunter and the bird have seen us. Aimless at dusk,
Heart muttering like any derelict,
Or working all morning, violent with will,
Where is my garland of lights? My silver rail?
- Robert Pinsky

Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय- अध्याय सतरावा- श्रद्धात्रयविभागयोग