मृतांचे आत्मे -एडगर ॲलन पो (१८०९-१८४९)- Spirits of the dead मृतांचे आत्मे
एडगर ॲलन पो (१८०९-१८४९)- Spirits of the dead - मृतांचे आत्मे राखाडी थडगी मनात भरती काळोखल्या जाणिवा एकाकी भ्रमतो तुझा जिवलगा आत्मा स्मशानात या कोणी ना जवळी , कुठे हरवली ती माणसे सर्व जी होती उत्सुक जाणण्यास अवघी एकांतगूढे तुझी एकांती , पण एकटा नसशी तू , हो शांत , मृत्युक्षणी , आत्मे वेढत ते तुला , सतत जे होते सवे जीवनी त्यांची उत्कट आस गूढ धरते छाया तुझ्याभोवती तू हो शांतच , स्तब्धतेतच रहा , जाणून घे ही स्थिती .. आहे स्वच्छ निरभ्र रात्र पण का रागावली आज ती नक्षत्रे वर उंच दूर परक्या स्वर्गातुनी पाहती हे तारेच कधी भरून हृदयी तेजाळती जीविषा आभा तीच तुला ज्वरात थकलेली भासते उष्णशा आता हा ज्वर सोसणे सतत तू , व्यापून राहे तुला आता जे स्फुरती विचार मनी ते सोडायचे ना तुला भासांचे जग आज जे बिलगले आहे तुला येथले , नित्याचेच , जणू तृणांत दंवबिंदू सर्द ओलावले देवाच्या श्वसनापरी झुळुक का नि : स्तब्ध़शी थांबली टेकाडावरले धुके सघनशी छाया जणू गोठली झाडांतून धुके असे लटकते की गूढ गूढातले काही अर्थ भयाण ते सुचव...