Posts

शहराचं शोकगीत : (अनुकृती- मूळ कविता रॉबर्ट पिन्स्की )

रॉबर्ट पिन्स्की हे १९४० मध्ये जन्मलेले अमेरिकेचे महान कवी, समीक्षक, साहित्यिक , अनुवादक.Poet Laureate म्हणूनही अमेरिकेने त्यांना मान्यता दिली. जवळजवळ १९ कवितासंग्रह लिहिणारे पिन्स्की कवितेला मौखिक कला मानतात आणि सामान्य लोकांना तिच्या महाप्रवाहात सामील करून घेण्याचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘’ City Elegies ‘’ – शहराचे शोकगीत - या कवितामालिकेचा पहिला भाग .ज्यात त्यांची महानगरीय संपन्न जाणीव आधुनिक कवितेची व्यामिश्र अनुभूती वाचकाला देते. शहराचं शोकगीत : प्रत्येकजण असा भरकटत रहातो इथे पूर्ण दिवसभर स्वतःचं बंदिस्त शहर घेऊन हेलकावत राहातो शहरभर मंत्रभारित ओसाड : जणू एक स्थानकच शहरगर्भात कुठे गेलं माझं ते दार जे उघडतं मागल्या आळीत ? भिंती दगडमंडित,चढउतरते वीटढिगारे,स्फटिक-कडे कुठं आहे तो माझा रेखीव रस्ता जाणारा बंदराकडे ? ती खानावळ ?कुठे लपला कारखाना? ते घर प्रेमाचे जोडकमानीची छतं ?ते काळोख कातळचौकोनांचे ? कुठाय ती बाग ? वृक्षात झाकलेलं बाकडं लोखंडी ? शहारत्या वेली.रहदारीवर झुकते देवदारांची रांग खडी आता आहे आपल्यामध्ये एक डोंगर, अरण्यातली दरी दोघांना पाहिलं जिथे श...

पोर्ट ऑफ स्पेन शहराच्या बागांमधली रात्र-डेरेक वॉलकॉट

डेरेक अॅल्टन वॉलकॉट ( Derek Alton Walcott ) जन्म १९३० , हे सेंट ल्यूशिया चे कवी आहेत. त्यांना १९९२ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार व अन्य अनेक साहित्यजगातील सन्मान मिळाले आहेत. त्यांची कविता   ‘’ Night in the Gardens of Port of Spain ‘’- ‘’ पोर्ट ऑफ स्पेन शहराच्या बागांमधली रात्र ’’ रात्रीच्या एका   वेगळ्याच विश्वाचा प्रातिभ वेध घेते . पोर्ट ऑफ स्पेन शहराच्या बागांमधली रात्र रात्र , काळोखी उन्हाळ्यातली , सोपे करून घेते तिच्या गंधांचं गाव ; ती अभेद्य कस्तुरीगंध होते एका निग्रोचा , घामाइतकी खाजगी होते ती , तिचे गल्लीबोळ सोललेल्या शिंपल्यांच्या वासाची दुर्गंधी येणारे. रसरसलेल्या कोळशासारखी संत्री , निखारलेल्या फोडी कलिंगडाच्या बाजार आणि डफाचे ताल वाढवत नेतात तिची धग नरकाची आग की वेश्याघर : पार्क स्ट्रीट क्रॉस करत एक लाट उसळते खलाशांच्या चेहऱ्यांची , विरून जाते. समुद्रा च्या  संथ चकाकीबरोबरच क्लबातलं रात्रजीवन किणकिणत रहातं काजव्यांसारखं रात्रीच्या घनदाट केशपाशात . मोटारींच्या हेडलाईटसमुळे अंधारते तिची नजर , ऐकू येत नाहीत  तिल...

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद – शहराची पलिकडची बाजू ..अवशेषांचे राज्य दिसे ओसाडीतील पडक्या विहिरीमधे गार काळोख वसे या अंधारी कुहरामध्ये खोल खोल हलते पाणी उतरत जाती आत पायऱ्या शिळ्या जळी त्या पूर्णपणी जणू मिळेना प्रमाण एखाद्या गोष्टीचे तरी कळे खूप खोल जाणारे काही गूढ तथ्य येथेच मिळे स्तब्ध उभे औदुंबर विहिरीस वेढत फांद्यांचे जाळे घुबडांच्या घरट्यांचे लोंबत भुरे रिते त्यातच गोळे जणू शेकडो पुण्यांचा आभास विजेचा चमकारा त्यातच मिसळे हिरवा कच्चा रानातील गंधित वारा या साऱ्यांतून आशंका कसल्याशा हृदयाला डसती घडून गेल्या रहस्यमयशा महानतेची अर्धस्मृती काठावरती टेकत हिरवे सुंदर कोपर बसलेली दिसते आहे तगर तारका-फुले पांढरी ल्यालेली तिच्यालगतची कण्हेर माझी लालबहर जी पाजळते धोक्याच्या एका बाजूला मला खुणावून बोलवते विहिरीचे उघडे काळे मुख आकाशा न्याहळे उगा खोल गूढ शून्यातच एका ब्रह्मसमंधाची जागा.. घुमती तेथे प्रतिध्वनिंचे प्रतिध्वनी गडबडलेले वेडे शब्दच..गहन अर्थ पण ते अनुमानापलिकडले क्षणक्षण तो घासे देहाला करे मलिनतेला साफ कसल्याशा पापाच्...

स्वागतगीत – Song of Welcome-जोसेफ ब्रॉडस्की -रशिया

जोसेफ ब्रॉडस्की ( Joseph Brodsky) रशिया नोबेल १९८७ स्वागतगीत – Song of Welcome ही तुझी आई आणि तुझे बाबा सोबत त्यांच्या रक्तमांसाचा तू म्हणून तुझं स्वागत ! का तुझ्या चेहऱ्याची पण उडालीय रंगत ? हे आहे तुझं जेवण आणि हे पेय नंतर करायचाच तर थोडासा विचारही कर स्वागत , हे सगळं आहे तुझंच तर ! ही घे तुझी पाटी .. आहे बरीचशी कोरी स्वागत तुझं , थोडासा उशीर झालाय जरी स्वागत , असू दे रे , आपलं कसलंतरी . हा तुझा पगाराचा चेक , आणि हे घरभाडे पांचवं मूलतत्त्व पैसा ! आहे का हे थोडे ? पैपैशासाठी तुझे स्वागत लाडेलाडे .. हा तुझा थवा आणि हे मोठ्ठे मध-पोळे स्वागत !पन्नासेक लाखांचे आहेत इथे गाळे एकमेकांसारखे तुम्ही , कुणी ना निराळे. स्वागत ! फोनबुकात तुझ्या नावापुढे चांदणी लक्ष्य लोकशाहीचे या आकड्यांची छुपी रेखणी स्वागत ! कीर्तीची ही खूण तुला वाटे देखणी . हे तुझं लग्न , आणि हा तुझा काडीमोड क्रम बदलणे अशक्यच ते , जाऊ दे रे सोड ! स्वागत तुझे !तुलाच ना हे वाटत होते गोड .. हे घे तुझं ब्लेड आणि हे आहे तुझं मनगट स...