Posts

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग 'राजविद्या राजगुह्ययोग' असे सुंदर नाव धारण करणारा भगवद्गीतेच्या ऐन मध्यावरील हा नववा अध्याय आहे.यात श्रीभगवंतांनी अध्यात्मविद्येला राजविद्या म्हटले आहे,म्हणजेच अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांची सम्राज्ञी आहे . याहीपुढे जाऊन श्रीभगवंतांनी या अध्यायात अध्यात्मविद्येच्या साधकांसाठी काही विलक्षण गूढांची उकल केली आहे . हेच ते राजगुह्य म्हणजे सगळ्यात मोठे गूढ .श्रीभगवंतांचे हे क्रांतदर्शी विवेचन आणि त्यावरील श्रीज्ञानेश्वरांचे निरूपण यामुळे हा अध्याय गूढाच्या प्रवासातील दीपस्तंभासारखा मार्गदर्शक झाला आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांविषयी व्यक्त केलेली आदरभावना नवव्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांबद्दल आत्यंतिक आदराची भावना प्रकट केली आहे. त्यांनी या श्रोत्यांना 'सर्वज्ञांचा समाज' म्हणून गौरविले आहे. अशा उदारधि श्रोत्यांचा आश्रय असेल, तर लळे व मनोरथ पूर्ण होणारच, कारण हे श्रोते त्यांना श्रीमंत माहेरासारखे कृपाशील व वत्सल वाटतात. कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती । जरी ...

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय-अध्याय सातवा -ज्ञानविज्ञानयोग

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय सातवा -ज्ञानविज्ञानयोग  सातव्या अध्यायामध्ये श्रीभगवंतांनी ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या संकल्पनांची मूलभूत स्वरूपाची चर्चा केली आहे .त्यांच्या स्वतःच्या व्यापक रूपाचा विस्तार वर्णन केला आहे .त्यांच्या दैवी मायेची दुर्लंघ्यता कथन केली आहे. अतिशय रोचक आणि परिपूर्ण अशा उपमा आणि रूपके यांच्या साहाय्याने या सर्व  संकल्पनांचे ज्ञानेश्वरांनी रसपूर्ण स्पष्टीकरण केले आहे . या अध्यायाच्या शेवटी अधिभूत ,अधिदैव,अधियज्ञ  अशा गहन संकल्पनांचा ओझरता उल्लेख येतो ती पुढील अध्यायाची नांदी आहे . ज्ञान विज्ञान आणि अज्ञान यांच्या माऊलीकृत व्याख्या - स्वरूपज्ञान म्हणजे आत्मज्ञान हेच विशुद्ध ज्ञान होय. या ज्ञानाच्या प्रकाशात विज्ञान आणि अज्ञान यांची व्याख्या श्री ज्ञानेश्वर करतात. मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥ स्व-रूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही . तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ...

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग -अध्याय सहावा

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -ध्यानयोग - अध्याय सहावा धृतराष्ट्राचा मोह सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच संजयाने धृतराष्ट्रास म्हटले," येथे श्रीकृष्ण योगरूप अभिप्राय अर्जुनास सांगण्यास सिद्ध झाले आहेत .अनायासे हे श्रवणाचे परमसुख आम्हास मिळत आहे .जणू ब्रह्मरसाचे हे जेवण रांधले असताना आपण येथे अकस्मात पाहुणे आलो किंवा तहानलेल्याने पाणी म्हणून प्यावे ते अमृतच असावे ,असा हा योग आहे." - यावर धृतराष्ट्र कोरडेपणाने म्हणाला," हे तुला आम्ही विचारले नाही." त्याच्या  या अलिप्तपणामागे त्याचा अविवेकी पुत्रमोह आहे, धृतराष्ट्र मोहाने ग्रासला आहे हे संजयाला जाणवले. सहाव्या अध्यायाचे ज्ञानदेवप्रणित महत्त्व आणि प्रतिज्ञा- समुद्रमंथनातून अमृतप्राप्तीचा जो क्षण, तोच या गीतार्थमंथनात सहाव्या अध्यायाचा आहे असं श्रीज्ञानदेव म्हणतात. गीतार्थाचे सारतत्त्व, विवेकसमुद्राचे पैलतीर,अनेक योगसमृद्धींचे भांडार या अध्यायात उमटले आहे .आदिमाया जेथे विश्रांती घेते, शब्दब्रह्म जेथे मौनात विलीन होते, तेथून याच्या अर्थाचा अंकुर जोमाने फोफावतो. श्रीज्ञानदेव प्रतिज्ञापूर्वक म्हणतात- माझा मराठाचि बो...

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -कर्मसंन्यास योग -अध्याय पाचवा

  ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -कर्मसंन्यास योग -अध्याय पाचवा अर्जुनाचा प्रश्‍न- संन्यास श्रेष्ठ की कर्म - पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुनाने श्रीहरीला विचारले," हे श्रीकृष्णा, हे तुमचे बोलणे तरी कसे आहे? तुम्ही एकच गोष्ट निश्चित सांगावी, तर ती अंतःकरणात धरून ठेवता येईल .मागे तुम्ही सकळ कर्मांच्या संन्यासाबद्दल बरेच निरूपण केले आणि आता कर्मयोगाच्या पक्षाने बोलत आहात .आम्हा अजाणांसमोर अशी द्व्यर्थी भाषा करून आपण आम्हाला गोंधळून टाकत आहात. ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥ ऐका. एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्‍यांनी सांगवयास पाहिजे काय ?  तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥ एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये.  "बोध हा नेहमीच एकाच तत्त्वाचा, एकाच निष्ठेने करावा हे काय मी तुम्हाला सांगावे? तर आता हा परमार्थ ध्वन्यर्थाने न सांगता प्रकटपणे सांगा...