माझ्या मोकळ्या वेळेत - पद्यानुकृती
समकालीन कविता - फादील अल अझावी (Fadhil al-Azzawi ,जन्म 1940 ) हे अरब जगतातील मान्यताप्राप्त इराकी कवी-साहित्यिक .अनेक कवितासंग्रह , कादंबऱ्या , समीक्षा व आत्मचरित्रात्मक लेखन त्यांनी अरेबिक भाषेत केले आहे. इंग्लिश साहित्याच्या पदवीबरोबर जर्मन भाषेतून उत्तम अनुवाद केले आहेत.इराकमधील सत्तांतरात तुरुंगवास सोसल्यानंतर ते पूर्व जर्मनीत राहतात.’’IN MY SPARE TIME’’ या त्यांच्या अफलातून कवितेतून अद्भुत कल्पनाविलास आणि विश्ववास्तवावरील एक खोचक भाष्य आपल्याला चकित करून जातं. माझ्या मोकळ्या वेळेत - पद्यानुकृती या कंटाळ्याच्या दीर्घ मोकळ्या प्रहरी मी घेऊन बसतो पृथ्वीगोल सामोरी खेळातच रचतो त्यावर नवीन देश अनुपस्थित जेथे पोलिस किंवा पक्ष उडवून टाकतो इतरही आणिक काही ते देश विचारत ज्यांना कोणी नाही ओसाड दूरवर वाळवंट रखरखते मी फुसांडणाऱ्या नद्या धाडतो तेथे निर्मितो मग नवे खंड आणखी सागर असू देत आपले! गरजच उद्भवली तर रंगीत नकाशा नवी रेखणी भारी - जर्मनी गुंडाळून प्रशांत सागरतीरी! पाण्यात व्हेल माशांची गजबज चाले ते तिचे किनारे धुक्यामध्ये बुडलेले गल्बते वल्हवत चाच्यांचीच खुशाल त्या किनाऱ्यास मग निर्वा...